केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आरोग्य सेवेला प्राधान्य देत खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर तयार करण्याच्या योजनेचा समावेश आहे. देशात तीन नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा (AIIMS) आणि गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेद चिकित्सा केंद्र स्थापन केले जाईल. मधुमेह आणि कॅन्सरवरील औषधे स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, ज्यात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद मार्गांचा समावेश आहे, तयार केले जातील. तसेच, पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू करण्याची योजना आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी, सेमीकंडक्टर उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्टससाठी प्रत्येकी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बायोफार्मासाठी १० हजार कोटी, तर सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी (MSME) १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले आहे. पर्यटन वाढीसाठी सी-प्लेन सुरू करून, २० प्रसिद्ध पर्यटनस्थळी १० हजार मार्गदर्शकांसाठी नवी योजना आणली आहे.