ताजी बातमी ऑनलाइन टीम
मित्रांनो येणाऱ्या एक जून पासून काही नियमांमध्ये बदल होणार असून याचा आर्थिक बोजा आपल्या खिशावर पडणार आहे. प्रत्येक महिन्यात आर्थिक बाबतीत काही नवनवीन नियम लागू होत असतात. आता एक जून पासून काही नवीन नियमांमध्ये बदल होत असून ते खालील प्रमाणे आहेत.
तेल विपणन कंपनी दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती अपडेट करत असतात. मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यवसाय सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. परंतु आता गॅस सिलेंडरच्या आणि व्यवसाय सिलेंडरच्या किंमती या 1 जून 2024 रोजी अपडेट केल्या जाणार आहेत.
बँकांना सुट्टी
आरबीआयने जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्ट नुसार बँका जूनमध्ये 8 दिवस बंद राहणार आहेत. रविवार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसह यात समावेश आहे. त्याचप्रमाणे ईद यांसारख्या इतर सुट्ट्यांमुळे जूनमध्ये बँका आठ दिवस बंद राहणार आहे.