Loan: आता मिळेल घरासाठी लगेच कर्ज, एलआयसी हाऊसिंगची विशेष योजना : धनंजय जगताप 

एलआयसी हाऊसिंग द्वारे जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना घर कसे घेता येईल यासाठी विविध योजना सातत्याने राबविल्या जातात. सातत्याने कमीत कमी खर्चात कमीत कमी व्याजात सर्वांना कर्ज कसे घेता येईल. याबाबत देखील विशिष्ट योजना कार्यान्वित केल्या जातात.

 

साहजिकच यामुळे अगदी तळागाळातील लोकांपर्यंत आमच्या एलआयसी हाऊसिंग च्या योजना पोहोचल्या असून सामान्यतील सामान्य देखील आता आपल्या स्वप्नातील घर घेत आहेत, बांधत आहेत. हे सुरुवातीला आम्ही गौरवाने सांगतो असे म्हणत एलआयसी हाऊसिंग च्या धनंजय जगताप यांनी गृह कर्ज बद्दलची सर्व माहिती ताजी बातमी टीमशी बोलताना दिली.

 

अधिक माहिती देताना एलआयसी हाऊसिंग चे धनंजय जगताप म्हणाले, प्रत्येक कुटुंबाचं स्वतःचं घर असावं ही आमची प्राथमिकता आहे. म्हणूनच आम्ही ग्राहकाभिमुख तसेच पारदर्शक आणि झपाट्याने होतील अशा योजना तात्काळ मंजूर करतो.

 

यासाठी कमीत कमी कागदपत्रे, आकर्षक व्याजदर, ग्राहकाच्या सोयीने हप्त्यांचे नियोजन या गोष्टी सांभाळत आम्ही गृह खरेदी, बांधकाम, पुनर्बांधणी साठी कर्ज, झपाट्याने मंजुरी आणि अतिशय सुलभ प्रक्रियेद्वारे ग्राहकांना मंजूर झालेल्या कर्जाचे पैसे मिळतील अशा योजना कार्यान्वित ठेवतो.

 

आतापर्यंत अनेक कुटुंबांनी या सर्वाचा लाभ घेतला असून आपली घरासंबंधीची सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत. यामुळे समाधानी ग्राहकांचा विश्वास हीच आमची ताकद बनली आहे.

 

अशी माहिती देत आपणही आपल्या घराचं स्वप्न दूर न ठेवता आत्ताच खालील दिलेल्या मोबाईल नंबर 9130813720, 7058583720 वर संपर्क साधण्याचे आवाहन धनंजय जगताप यांनी केले आहे.