मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की लोकडाऊन नंतरच्या काळामध्ये लोकांनी केलेली सर्व सेविंग संपलेल्या आहेत. कारण लोकांना जे काही सेविंग केलेले आहे ती त्या काळामध्ये उपयोगी पडलेले आहेत. फक्त काम करून पैसे कमावणे व ते पैसे खर्च करणे यामुळे आपण जीवनामध्ये काहीही साध्य करू शकत नाही. जर आपल्याला चांगली श्रीमंती हवी असेल तर पैसे सेविंग केलेच पाहिजे आणि यासाठीच आजच्या लेखामध्ये आपण सेविंग करण्यासाठी सोप्या अशा पाच टिप्स जाणून घेणार आहोत.
त्यातील पहिली टिप्स म्हणजे तुमची जीवनशैली साधे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचा अर्थ असा की जे काही समाजामध्ये वावरत आहात ते साधेपणाने वावरायला शिका. वायफळ पैसे खर्च करू नका. एखादी वस्तू चांगली दिसली म्हणून त्यावर ती वस्तू असताना देखील आपण त्यावर पैसे खर्च करतो आणि यामुळे काय होतं आपण पैसे कमवतो ते कारण नसताना उगाचच खर्च करत राहतो आणि यामुळे आपली सेविंग राहत नाही. आपल्याकडे चार पैसे टिकून राहत नाहीत. म्हणून आपली जी काही जरी जीवनशैली आहे ती साधे ठेवण्याचा प्रयत्न करा.
दुसरी टिप्स म्हणजे योग्य नियोजन करणे. आपण जे काही पैसे कमवत आहोत म्हणजेच आपल्याला मिळणारे जे काही पैसे असतील ते कमी असतील किंवा जास्त असतील त्याचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. आपला जो काही पगार येतो तो योग्य नियोजन पद्धतीने त्याचा वापर करा. म्हणजे आपला जो काही जीवनावश्य खर्च आहे त्याचे पैसे बाजूला काढा व इतर खर्च बाजूला काढा आणि जे काही पैसे पुरतील ते पैसे तसंच ठेवा व त्या पैशाचा मी पुढच्या महिन्यात काहीतरी वापर करून खर्च करेल असा विचार करण्यात टाळा व जसे शक्य होईल तसे प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे का होईना बचत म्हणून बाजूला काढावे. अशामुळे तुम्हाला बचतीची सवय लागेल.
तिसरी टिप्स म्हणजे इनकम सोर्सेस चा वापर करा. आजकालची तरुण पिढी ही कितीही चांगली नोकरी असली तरी दुसऱ्या कोणत्या इनकम सोर्सेस मधून आपल्याला पैसे कमवता येतील का? याच्याकडे जास्त लक्ष देत आहेत. खरंतर ही चांगली गोष्ट आहे. कारण त्या इन्कम सर्च मधून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात व त्या गोष्टींमुळे आपल्या चांगले इनकम देखील मिळू शकते. हे मिळालेले इनकम आपण आपली बचत म्हणून बाजूला देखील काढू शकतो. यामुळे देखील आपल्याला बचतीची सवय लागू शकते.
चौथी टीप म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात त्यामधून आवश्यक असताना किंवा नसताना ब्रेक हा घेतलाच पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रेकचा आणि सेविंग चा काय संबंध. तर याचा संबंध आहे. जर तुम्ही रोजच्या रोज तेच रुटीन फॉलो करत असाल म्हणजेच कामाला जात आहे यामुळे तुमचा मन दुसरीकडे लागत नाही आणि वेगळाच त्रास निर्माण होतो. म्हणून महिन्यातून, दोन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून आपण आपल्या फॅमिलीला वेळ देणे खूप गरजेचे आहे. एक दोन दिवसाची ट्रीप काढून आपण फिरायला गेल्यामुळे आपला मायेंड चेंज होतो आणि यामुळे देखील आपल्याला वेगळ्या प्रकारचे विचार करण्यास मदत होते व बचतीचा मार्ग देखील सापडत असतो.
पाचवी टीप म्हणजे आपली गरज ओळखून पैसे खर्च करावे व सेविंग करावे. म्हणजे जर आपला एखादा वस्तूची आत्ता आवश्यक गरज असते. ती वस्तू घेणे खूप गरजेचे असते. तर त्या वस्तूसाठी म्हणून आपण बचत करू शकतो व त्यासाठी बचत केलेले पैसे खर्च देखील करू शकतो. कारण ही आपल्याला खूप गरजेचे असणारी वस्तू आहे आणि यामुळे आपल्याला बचतीची देखील सवय लागू शकते.
अशाप्रकारे या काही पाच टिप्स आहेत. त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला बचतीची सवय लागू शकते.