काहीही काम न करता पैसे कमवायला शिका..

मित्रांनो, बराच जणांचा स्वप्न असते की कोणत्याही कष्ट न घेता आपण झोपलेले असताना देखील आपली इनकम ही चालूच राहायला हवी. यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे याची माहिती नसल्यामुळे आपण प्रत्येक जण काम करत असतो आणि ते मरेपर्यंत आपल्याला करावीच लागते. आणि त्यातूनच आपल्याला पैसे मिळत असते.

 

पण काही जण कसे काही आपले इन्कम सोर्स जनरेट करत असतात की ज्यातून त्यांनी झोपले असताना देखील त्यांच्या इन्कम चालूच असतात. त्यासाठी आपल्याकडे passive income ideas असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण या लेखातून अशा काही सहा passive income ideas ज्यामध्ये फक्त आपल्याला एकटाच काम करायचं आहे व आपली इन्कम आपण झोपताना देखील चालू राहील. याचेच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

आपले इन्कम दोन प्रकारचे असते ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिवे इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे जोपर्यंत आपण काम करत आहोत, जोपर्यंत आपण मजुरी करत आहोत तोपर्यंत त्यातून आपल्याला पैसे मिळत असते. passive इन्कम म्हणजे आपण थोड्या प्रमाणात कष्ट घेऊन देखील आयुष्यभर कोणतेही काम न करता आयुष्यभर पैसे हे मिळत असतात. आता यामध्ये सर्वांनाच वाटत असेल की आपण ऍक्टिव्ह इन्कम करण्यापेक्षा passive इन्कम करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. तर त्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण सहा passive इन्कम ideas जाणून घेणार आहे.

 

पहिली आयडिया म्हणजे passive उत्पन्न मिळविण्यासाठी सर्वात लोकप्रिय म्हणजे तुमची मालमत्ता भाड्याने देणे. जरी हे पसंतीच्या निवडींपैकी असले तरी, ते राखणे सर्वात सोपे नाही आणि तुम्ही सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे. तुमची भाड्याची मालमत्ता एक फायदेशीर उपक्रम कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ देखील गुंतवावा लागेल किंवा तुम्ही तुमची गुंतवणूक गमावाल. परंतु एकदा का तुम्हाला रिअल इस्टेटची मूलभूत माहिती समजली की, तुमचा passive कमाईचा प्रवास सुरू करण्यासाठी मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे ही एक उत्तम पद्धत आहे.

 

दुसरी आयडिया म्हणजे शेअर मार्केटिंग. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या उद्दिष्टात जोखीम कमी करताना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे समाविष्ट आहे. उच्च लाभांश स्टॉक, म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये गुंतवणूक करून तुम्ही हे घडवून आणू शकता. तथापि, हा उद्योग गोंधळात टाकणारा असू शकतो. सुरुवातीला, मार्केट कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आगाऊ वेळ आणि मेहनत गुंतवावी लागेल. पण एकदा का तुम्हाला ते हँग झालं की तुम्हाला हे समजेल की passive income निर्माण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

 

तिसरी आयडिया म्हणजे अफिलेट मार्केटिंग.तुमच्याकडे सोशल मीडिया आणि लोकांच्या आवडीनिवडी प्रभावित करण्याचे कौशल्य आहे का? त्याचा फायदा घेण्यासाठी संबद्ध विपणन हा एक उत्तम मार्ग असू शकतो. तुम्ही कंपन्यांसोबत भागीदारी करू शकता आणि तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाइटवर त्यांची उत्पादने किंवा सेवांचा प्रचार करू शकता. कोणीतरी तुमच्या युनिक संलग्न लिंकवर क्लिक करून खरेदी केल्यास, तुम्हाला कमिशन मिळते. तुमच्या विद्यमान प्रेक्षकांची कमाई करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आणि त्यासाठी किमान आगाऊ गुंतवणूक आवश्यक आहे.

 

चौथी आयडिया म्हणजे Content Creation. तुम्हाला तर माहीतच असेल की आज काल मोबाईल फोनचा तसेच संगणकाचा, लॅपटॉपचा जास्त प्रमाणात वापर वाढलेला आहे. यामध्ये लोक विविध प्रकारचे व्हिडिओ बघत असतात. जर आपल्याला कोणत्या गोष्टीची माहितीची आवश्यकता असेल तर ते आपण youtube वर सर्च करतो किंवा फेसबुक वर सर्च करत असतो आणि त्याबाबतचा व्हिडिओ पाहत असतो. मनोरंजनासाठी अनेक ॲप आहे. मनोरंजनासाठी व्हिडिओ बघत असतो. हे व्हिडिओ जर आपण बनवले तर यातून आपल्याला जोपर्यंत तो व्हिडिओ लोक पाहत आहे तोपर्यंत आपण आपल्याला इनकम ही मिळत असते. म्हणून हा एक passive income खूप चांगली आयडिया आहे.

 

पाचवी आयडिया म्हणजे E-BOOK. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा जर संपूर्ण ज्ञान असेल तर ती व्यक्ती त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपला भाषेत मांडून एक पुस्तक तयार करू शकतो. हे आपण पुस्तक तयार केलेले इंटरनेटच्या साह्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेल देखील करू शकतो. या द्वारे देखील तुम्हाला चांगली इन्कम मिळू शकते. साठी देखील तुम्हाला फक्त एकदा काहीतरी काम करावे लागेल व त्यानंतर तुम्ही जोपर्यंत तुमचा हा e book वाचत आहे तोवर तुम्हाला त्याचे पैसे मिळत जाते.

 

सहावी आयडिया म्हणजे FREE STOCK VIDEO SITES. यामध्ये देखील आपल्याला फक्त एकदा मेहनत करावी लागेल आणि त्याचे फायदे आपल्याला जीवनभर मिळू शकतात. यामध्ये असं केले जाते की जर तुम्हाला विविध गोष्टींचे फोटोग्राफीचे ज्ञान असतील किंवा व्हिडिओ चे ज्ञान असेल तर विविध प्रकारचे फोटो तुम्ही काढून वेबसाईटवर टाकू शकता आणि त्या वेबसाईटवरून जर एखाद्या व्यक्तीने ते फोटो किंवा तो व्हिडिओ डाऊनलोड करून घेतला तर त्याद्वारे तुम्हाला पैसे मिळत असतात.

 

अशाप्रकारे हे काही सहा पॅसिव्ह इन्कम आयडियाज आहे. तुम्हाला देखील तुमची इन्कम आयुष्यभर चालू ठेवायचे असेल तर नक्कीच तुम्ही या सहा गोष्टींचा विचार करा.