Diwali Offers : न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त आकर्षक ऑफर्सना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद 

ताजी बातमी ऑनलाईन टिम

 विश्वास आणि सेवेची पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्सकडून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या विशेष ऑफर्सना ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अर्धशतक पूर्ण केलेल्या या प्रतिष्ठानाने नेहमीप्रमाणे यंदाही आपल्या ग्राहकांसाठी खास सवलती व भेटवस्तूंची मेजवानी ठेवली आहे.

1975 साली छोट्या सुरुवातीने सुरू झालेल्या न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्सने आज घरगुती उपकरणांपासून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांपर्यंत उत्कृष्ट सेवा देत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. या यशस्वी प्रवासाच्या आणि दिवाळीच्या दुहेरी आनंदानिमित्ताने सुरु झालेल्या भव्य ऑफर फेस्टिव्हलला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या संदर्भात संस्थेचे प्रमुख श्री. सुजित मगदूम म्हणाले, “ग्राहकांच्या प्रेमामुळेच आम्ही पन्नास वर्षांचा प्रवास पूर्ण करू शकलो. त्यामुळे या दिवाळीत आम्ही ग्राहकांना अधिक आनंद देण्यासाठी विशेष ऑफर्स आणल्या आहेत.”

ऑफरची ठळक वैशिष्ट्ये:

  • शोरूममधून कोणतीही वस्तू खरेदी केल्यास ५०% रोख परतावा मिळवण्याची सुवर्णसंधी.

  • क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर ५०% पर्यंत डिस्काउंट.

  • बजाज फायनान्ससोबत 0% व्याजदराची EMI सुविधा, तसेच मोफत EMI कार्ड.

  • फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदीवर ५ आकर्षक गिफ्ट्स मोफत!

  • एलईडी टीव्ही फक्त ₹७,९९० पासून, तर ब्रँडेड एसी विशेष सवलतीच्या दरात.

  • LPG गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर – जुन्या शेगडीच्या बदल्यात नवीन.

  • खरेदीसोबत आकर्षक फ्री गिफ्ट्स.

 याचबरोबर, सर्व प्रकारचे टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, एसी आणि इतर उपकरणांचे रिमोट्स फक्त ₹49/- पासून उपलब्ध असून, होलसेल दरात विक्री सुरु आहे. त्यामुळे जुन्या किंवा खराब रिमोटच्या बदल्यात कमी किमतीत नवीन रिमोट घेण्याची ही उत्तम संधी आहे.

न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्समध्ये LG, Samsung, Bosch, Philips, Haier, Clarion, Orient, Bajaj यांसारख्या नामांकित ब्रँड्सची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे.

विश्वासाची ५० वर्षे आणि दिवाळीचा आनंद एकत्र साजरा करण्यासाठी आजच न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या. आकर्षक ऑफर्स, परतावा योजना आणि विशेष रिमोट स्कीमचा लाभ घ्या आणि आपल्या घरासाठी दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने किफायतशीर दरात खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका!   असे सांगत न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख श्री. सुजित मगदूम यांनी  न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्स , कोल्हापूर रोड, LG ब्रँड शॉपी व मल्टिब्रँड शॉपी, कोल्हापूर नाका, इचलकरंजी येथे  भेट देऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.