ज्या विद्यार्थ्यांनी नुकताच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिल्या त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे निकालाबाबत. या दोन्ही परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहेत
याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे पहिल्यांदा मे च्या पहिल्या आठवड्यामध्ये बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होईल तर दुसऱ्या आठवड्यात दहावीच्या निकालाची तारीख जाहीर होईल.
या दोन्ही परीक्षांचे निकाल 15 मे पूर्वी जाहीर होतील असे मुख्य संकेत आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेण्याची जी प्रक्रिया असते त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी बोर्डाने यंदा लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचे ठरले आहे.
यापूर्वी अनेकदा निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा प्रवेश घेण्याचा कालावधी न मिळाल्याने अडचणी उद्भवल्या होत्या.
आताचे जाहीर होणारे दहावी बारावीचे निकाल खालील वेबसाईटवर पाहता येतील.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in