राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले केले आहे. २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत.
२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे.
पहिले शैक्षणिक सत्र कधी संपणार?
माध्यमिक शाळा संहितेनुसार, सत्रांची रचना जाहीर करण्यात आली असून, चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र हे सोमवारी १५ जूनपासून सुरू झाले आहे. ते शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी २०२६ रोजी संपणार आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिवाळीची सुट्टी २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असणार आहेत. या कालावधीत धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा, बालिप्रतिपदा, भाऊबीज या सार्वजनिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.
शाळांना उन्हाळी सुट्ट्या किती दिवस असणार?
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सर्व शाळा १६ नोव्हेंबर २०२६ पासून पुन्हा सुरू होणार आहेत. शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ पर्यंत असणार आहे. त्यानंतर ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी असणार आहे.
माध्यमिक शाळा संहितेनुसार, संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.