भारतीय शेअर बाजारात 24 नोव्हेंबरला गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. सेन्सेक्स 331 अंकांनी घसरून 84900.71 वर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक 108.65 अंकांनी घसरुन 25959.50 अंकांवर बंद झाला.
आज जवळपास सेक्टोरल निर्देशांक घसरण झाली आहे. सर्वात मोठी घसरण निफ्टी रिअल्टी निर्देशांकात झाली. याशिवाय मेटल, कंझ्यूमर ड्युरेबल्स, ऑईल अँड गॅस, हेल्थकेअर, एफएमसीजी आणि मिडिया निर्देशांक दबावात राहिले.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मिळणार 3 हजार रुपये?
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
निफ्टी आयटी निर्देशांकात सोमवारी तेजी पाहायला मिळाली. आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आणि घसरण पाहायला मिळाली.
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 472.22 लाख कोटी रुपयांवरुन 469.36 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. म्हणजेच जवळपास 3 लाख कोटी रुपयांचं नुकसान एका दिवसात झालं आहे. गुंतवणूकदारांना एका दिवसात मोठा फटका बसला आहे.
D Mart Offers : डी मार्ट मध्ये कोणत्या दिवशी मिळत सर्वात स्वस्त सामान? वाचा आत्ताच
सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सर्वात आकर्षक योजना
Salary Slip Home Loan: सॅलरी स्लिप नाही, तरीही मिळवा पर्सनल लोन किंवा होम लोन : जाणून घ्या माहिती
बीएसई सेन्सेक्सवरील 30 पैकी केवळ 8 शेअर तेजीसह बंद झाले. यात टेक महिंद्रा, एशियन पेंटस,एचसीएल टेक, इन्फोसिस, अदानी पोर्टस हे स्टॉक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्सवरील इतर स्टॉक घसरणीसह बंद झाले. भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंटच्या शेअरमध्ये घसरण झाली.
बीएसईवरील 4449 शेअर पैकी 3036 स्टॉकमध्ये घसरण झाली. तर 1208 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. 205 शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही. तर, 93 स्टॉकनं 52 आठवड्याचा उच्चांक गाठला तर 359 स्टॉकनं नीचांक गाठला. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)