Sure Water botle: आता पाणी विकणार मुकेश अंबानी; बिसलरी, किनले ब्रँडला मोठी टक्कर 

ताजी बातमी ऑनलाईन टीम

 

Reliance consumer sure water brand : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आता पाणी विकणार आहेत म्हणजेच काय तर shure मिनरल वॉटर या नावाने मुकेश अंबानी आता पाण्याचे व्यवसायात देखील येणार आहेत. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या युनिट रिलायन्स कंजूमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ने बाटलीबंद सेगमेंटमध्ये उडी घेतली आहे.

 

यामुळे बिसलरी व किनले अशा पाणी विकणाऱ्या मोठ्या कंपन्या याचबरोबर काही छोट्या कंपन्या कशी टक्कर देतील याचा पहावयास मिळेल. कारण रिलायन्सने अत्यंत कमी दरात हे शुद्ध पाणी बाटलीबंद करून विकणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता पाणी क्षेत्रात वॉर रंगण्याची शक्यता आहे.

 

शुअर ही पाण्याची कंपनी एक गुणवत्तेचा ब्रँड असून ती बजेट थंडी देखील असेल असे त्यांनी सांगितले आहे आणि आता सुरू असलेल्या पाण्याच्या बाटलीमध्ये सर्वात कमी किंमत ही रिलायन्स ची शुअर पाणी बॉटल कंपनी ठेवणार आहे. साहजिकच यामुळे बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

 

Reliance consumer sure water brand :

 

शुअर या कंपनीची पाणी बॉटल 250 मिली लिटरला फक्त पाच रुपयात खरेदी करण्यात येणार आहे तर त्यापेक्षा मोठी बॉटल इतर कंपनीच्या तुलनेत अगदी 20 ते 30% पर्यंत कमी किंमत ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अनेकांना रोजगार देखील मिळत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.