राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातली पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये सरकार कडून जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत १२ हप्ते या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. आता जुलैच्या हप्ताची प्रतीक्षा महिलावर्ग करत आहे. मात्र महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकाच वेळी मिळतील असं बोललं जातंय.
यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भाऊंच्या जिव्हाळ्याचा सण, उत्सव… या निमित्त महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) जूनच्या आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे मिळून ३००० रुपये सरकार देऊ शकते. रक्षाबंधन निमित्त सरकार कडून मिळालेली हि जणू भेटच असेल. मात्र अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा याबाबत सरकार कडून करण्यात आलेली नाही. परंतु मागच्या वर्षी रक्षाबंधनला २ महिन्याचे एकदम ३००० रुपये महिलांना मिळाले होते. त्यामुळे आताही असच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची रक्षाबंधन धुमधडाक्यात होऊ शकते.
योजनेतील पडताळणी स्थगित – Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ पात्र महिलांनाच मिळतोय का कि या योजनेचा चुकीचा वापर केला जातोय यासाठी राज्य सरकार कडून या योजनेची पडताळणी काही महिन्यापासून सुरु आहे. त्यानुसार, सरकारी कर्मचारी असलेल्या महिला, इनकम टॅक्स भरणाऱ्या महिला, चारचाकी असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. मात्र सरकारने आता हि पडताळणी स्थगित केल्याचं बोललं जातंय. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबवल्याच्या चर्चा सुरु आहेत. आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका लक्षात घेता ही छाननी प्रक्रिया जैसे थे आहे. या निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावले उचलण्याची शक्यता आहे.