Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत

Apple म्युझिकच्या इंडिव्हिज्युअल, फॅमिली आणि विद्यार्थी प्लॅन्सच्या मासिक सबस्क्रिप्शन शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

 

ॲपल वनच्या इंडिव्हिज्युअल, फॅमिली आणि प्रीमियर प्लॅन्ससाठीही आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

 

किंमती वाढल्या असल्या तरी ॲपलने कोणत्याही नवीन फीचर्सची घोषणा केलेली नाही.

टेकजायंट कंपनी ॲपलनेत्यांच्या भारतीय यूजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने भारतात त्यांच्या म्यूजिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ॲपल म्युझिकच्या सब्सक्रिप्शनच्या किंमती वाढवल्या आहेत. अलीकडेच कंपनीने मॅक आणि आयपॅडसाठीच्या ॲपलकेअर+ प्लॅन्सच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे आता भारतातील यूजर्सना ॲपल म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. नवीन किंमती केवळ भारतातच नाही तर अमेरिका, ब्रिटेन, यूरोप आणि इतर अनेक देशांमध्ये देखील लागू करण्यात आल्या आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

कंपनीने का घेतला हा निर्णय?

 

कंपनीचं असं म्हणणं आहे की, म्यूजिक लाइसेंसिंगच्या वाढत्या किंमतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापी, सर्वात महत्त्वाचे म्हणजेच किंमती वाढल्यानंतर देखील यूजर्सना कोणत्याही प्रकारचे नवीन फीचर्स पाहायला मिळणार नाहीत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर आता यूजर्सना ॲपल म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

 

ॲपल म्युझिक सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या नवीन किंमत

 

ॲपल म्युझिकच्या इंडिव्हिज्युअल प्लॅनची किंमत आता 139 रुपये प्रती महिना झाली आहे. तर यापूर्वी हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 119 रुपये खर्च करावे लागत होते. तर फॅमिली प्लॅनची किंमत यापूर्वी 179 रुपये होती. मात्र आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 229 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत. इतकंच नाही, यापूर्वी स्टूडेंट प्लॅनची किंमत 59 रुपये होती. मात्र आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 69 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत. या नवीन किंमती ॲपलच्या वेबसाईटवर देखील अपडेट झाल्या आहेत.

 

ॲपल वन सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या नवीन किंमत

 

केवळ ॲपल म्युझिकच नाही तर कंपनीने ॲपल वन सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमतीत देखील वाढ केली आहे. ॲपल वनच्या बंडल प्लॅनमध्ये ॲपल म्युझिक, ॲपल टीव्ही+, ॲपल आर्केड, आयक्लॉड+, ॲपल फिटनेस+ आणि काही देशांमध्ये ॲपल न्यूज+ या सर्वित्र एकत्र ऑफर केल्या जातात. त्यामुळे हा बंडल प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात.

 

ॲपल वन इंडिव्हिज्युअल प्लॅनची किंमत यापूर्वी 175 रुपये होती. मात्र आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना 195 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत. तर ॲपल वन फॅमिली प्लॅनची किंमत यापूर्वी 235 रुपये होती. मात्र आता या प्लॅनसाठी यूजर्सना 295 रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. तसेच, ॲपल वन प्रीमियर प्लॅनच्या खरेदीसाठी आता 899 रुपयांऐवजी 995 रुपये प्रती महिना खर्च करावे लागणार आहेत.