दिवाळी सणांमध्ये वेगवेगळे प्रकारच्या ऑफर्स येत असतात त्याच मध्ये आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनी त्यांच्या ग्राहकांना आकर्षित भेट देण्याचे सांगितले आहे त्यांनी लॉन्च केलेल्या जिओ भारत 4 G फोनची किंमत कमी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कमी रिचार्ज पासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंतची सुविधा प्रदान केली आहे. या फोनच्या किमतीत सुमारे 30 टक्क्यांनी कमी केल्याने ग्राहकांच्या खर्चात जवळपास 300 रुपयांची बचत होणार आहे.
123 रुपयांचा रिचार्जमध्ये अनेक सेवा
जिओभारत 4G फोनमध्ये केवळ 123 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉलिंग आणि 14 जीबी डेटा मिळेल, त्यामुळे हे अन्य कंपनीच्या तुलनेत 40 टक्के स्वस्त आहे. इतर नेटवर्क्स फीचर फोनसाठी किमान 199 रुपयांचे रिचार्ज करावा लागतो .पण जिओमुळे ग्राहकांच्या पैशाची बचत होणार आहे. हा फोन फक्त कॉल करण्यासाठी नसून तो 2G वरून 4G वर शिफ्ट होण्याची उत्तम संधी आहे. तसेच यामध्ये तुम्ही 455 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, मूव्ही प्रीमियर, नवीन चित्रपट, लाईव्ह स्पोर्ट्स शो आणि जिओसिनेमा हायलाइट्ससारख्या सुविधांचा समावेश आहे. यासोबत जिओपे आणि जिओचॅट सारखे प्री लोडेड अँपसुद्धा उपलब्ध आहेत, ज्यामुळे डिजिटल पेमेंट आणि चॅटिंग करणे खूपच सोपे होते.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
किंमत
अलीकडेच जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस ( IMC 2024 ) दरम्यान जिओभारत सीरीज अंतर्गत दोन नवीन 4G फीचर फोन जिओभारत V3 आणि V4 लाँच केले आहेत. या दोन्ही फोनची किंमत केवळ 1099 रुपये आहे, आणि ते जिओमार्ट, अॅमेझॉन किंवा जवळच्या मोबाइल स्टोअरवरून खरेदी करता येऊ शकतात. जिओभारत 4G फोन जो आधी 999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता तो आता लिमिटेड टाइम ऑफरमुळे फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.