Ola Electric Festive Offer 2025 : इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची सुवर्णसंधी : ओला इलेक्ट्रिकची विशेष सवलत योजना

Ola Electric Festive Offer 2025 :
अलीकडच्या काळात भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसागणिक वाढत चालला आहे. इंधनाच्या म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती याचबरोबर पर्यावरणाचे होणारे नुकसान पाहता सर्वांच्या नजरा आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचे दिसून येत आहे. आणि हीच लोकांची गरज ओळखून ओला इलेक्ट्रिक ही वाहन तयार करणाऱ्या कंपनीने विशेष सवलत योजना सुरू केली आहे.

आणि मुख्य म्हणजे आता दसरा दिवाळी असा सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि या दरम्यान वाहनांची खरेदी मोठी प्रमाणात केली जाते याचाच फायदा घेत. अधिकाधिक ग्राहक मिळवण्यासाठी ओला कंपनीने नवीन योजना बाजारात आणले आहेत. साहजिकच यात ग्राहकाचा देखील भरपूर फायदा होणार आहे.

ओला कंपनीच्या या विशेष सवलती बद्दल जाणून घेऊ…

Ola Electric ने Festival Muhurt Mahotsav या नावाने ही योजना सुरू केली असून या कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या स्कूटर मॉडेलवर मोठ्या प्रमाणात किंमत कमी करण्यात आली आहे.

* Ola s 1x या मॉडेलची किंमत आता फक्त रुपये 49,999 पासून सुरू करण्यात आले असून याला सबसिडी देखील मिळू शकते आणि त्याची किंमत अजून कमी होऊ शकते.

* Ola s1 Air आणि pro या प्रीमियम मॉडेल्सवर काही हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस देखील सुरू करण्यात आला आहे

इतकच नाही तर या कंपनीने काही निवडक मॉडेल साठी अगदी झिरो पोस्टिंग फिट देखील ठेवली आहे आणि कमी व्याजदरावर कमीत कमी हप्त्यात लोकांना हे वाहन खरेदी करता यावं अशी योजना देखील आणली आहे यामुळे ग्राहकांना मोठी रक्कम भरावी तर लागणार नाहीत आणि अगदी सुलभ हप्त्यात आपणाला गाडी खरेदी करता येणार आहे.

या योजनेचे फायदे आता आपण पाहू…

1 किमतीत बचत: ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे असणाऱ्या मूळ किमतीतच कमी झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा म्हणून स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.

2. देखभालीचा खर्च : यासाठी हे वाहन इलेक्ट्रिक असल्याने कोणत्याही प्रकारचे ऑइल बदलणे किंवा वारंवार पेट्रोल करणे असा कोणताही त्रास नसल्याने दीर्घकाळ आपणाला कोणताच खर्च येत नाही त्यामुळे भरपूर बचत होते.

3. सबसिडी चा फायदा : सरकार अनेक इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान देत आहे त्याचबरोबर सनासुदीच्या सवलती मिळत असल्याने किंमत अगदीच कमी दरात कमी होऊन पैशाची मोठी आपली बचत होते आणि कमीत कमी दरात आपणाला वाहन मिळते.

4. पर्यावरण पूरक : हे वाहन मुळातच इलेक्ट्रिक असल्याने यामधून कोणताही धूर येत नाही आवाज देखील कमी असतो त्यामुळे कोणत्याही प्रदूषण पसरत नाही. त्यामुळे पर्यावरणच्या दृष्टीत देखील हितकारक ही बाब असणार आहे.

Ola Electric Festive Offer 2025 :
गाडीची ताकद : ओला इलेक्ट्रिकची ही गाडी भारत देशात अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्याने देशात अनेक ठिकाणी याचे चार्जिंग नेटवर्क उभारले आहे या गाडीला हायपर चार्जर स्टेशन असल्याने अगदी फास्ट चार्जिंग होते. अगदी पंधरा ते वीस मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्जिंग होते. आणि ही गाडी 100 ते 180 किमी पर्यंत रेंज देते.

ही कंपनी सतत बॅटरी टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर अपडेट्स वर विशेष काम करत असल्याने ग्राहकांना याचा मोठा लाभ देखील मिळतो आणि त्याचा अनुभव देखील सध्या लोकांना मिळत आहे.

आता सुरू असलेल्या दसरा दिवाळीच्या काळात स्कूटर खरेदी करण्यासाठी एक विशेष बाब ठरणार आहे एकीकडे कंपनीने किंमत कमी केली आहे तसेच ईएमआय वर देखील गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर सबसिडी देखील देण्यात आली आहे.

या सर्वांचा संगम केल्यास आपणाला नक्कीच कमीत कमी पैशांमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरची एक किपाची आणि पर्यावरण पूरक गाडी सहज आपल्याला मिळू शकते. किरणा मर्यादित कालावधीसाठीच असल्याचे समजते यामुळे ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.