दमदार फीचर्ससह OPPO A3x 4G फोन लाँच ; फक्त 8999 रुपयात करा खरेदी

मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळ्या नवीन कंपन्यांचे फोन लॉन्च होत असतात. त्याचबरोबर आता OPPO ने गेल्या दोन महिन्या अगोदर नवीन फोन लॉन्च केला आहे a3x5g स्मार्टफोन म्हणुन ओळखला जात असून, लवकरच हा फोन 4G वेरिएंटमध्ये बाजारात मिळणार आहे. दिवाळीमध्ये फोनची किंमत 10000 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडण्याजोगा फोन मिळणार आहे. अनकेजण या फोनकडे आकर्षित होताना दिसत आहेत. तसेच हा बजेट फोन मिलिटरी ग्रेड शॉक रेसिस्टन्स आणि मल्टिपल लिक्विड रेसिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.

Elon Musk will come to India: This will make these shares jump like a rocket :एलॉन मस्क भारतात येणार : यामुळे हे शेअर्स रॉकेट प्रमाणे झेप घेणार

OPPO A3x 4G फीचर्स

या शानदार फोनचा डिस्प्ले 6.67 इंचाचा असून 90Hz रिफ्रेश रेट आणि 1604×720 पिक्सेल रिझोल्यूशन पाहण्यास मिळणार आहे. तसेच 1000 निट्स पीक ब्राइटनेस व 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. याचे प्रोसेसर Qualcomm Snapdragon 6s 4G Gen 1 चिपसेट, Adreno GPU ग्राफिक्स कार्डसोबत आहे. माहिती साठवण्यासाठी फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्राहक त्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे. याची ऑपरेटिंग सिस्टम ColorOS 14 बेस्ड Android 14 एवढी आहे.

Fatakpay Personal Loan : 1 हजारापासून 2 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन : Fatakpay लोन : अर्जंट उपलब्ध सर्वांसाठी

ड्युअल कॅमेरा

फोटोग्राफ काढण्यासाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो 8MP असून , सेल्फीप्रेमींसाठी 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 45W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5100 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे कमी वेळेत लगेच चार्जिंग होणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G, ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, USB टाइप C पोर्टची सेवा मिळणार आहे. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे.

 

 

फोनची किंमत

हा फोन निळ्या आणि लाल रंगात उपलब्ध आहे. स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च झाला असून , 4GB/64GB फोनची किंमत 8999 रुपये आणि 4GB/128GB याची किंमत 9999 रुपये आहे. हा फोन ग्राहकांच्या सेवेत 29 ऑक्टोबरपासून ओप्पो इंडिया ई-स्टोअर तसेच प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे.