घरबसल्या हे सरकारी कोर्स करुन मिळवा लाखो रुपये..

मित्रांनो, नुकताच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि यापुढे हे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करू इच्छितात. त्यांच्यासाठीच आज आपण एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे असे की हे विद्यार्थी घर बसल्या शिक्षक घेऊन लाखो रुपयांची नोकरी मिळवू शकतात. घरबसल्या शिक्षण देणाऱ्या गव्हर्नमेंटच्या पाच संस्था आहेत. या संस्था तुम्हाला घरबसल्या शिक्षण देतात. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

 

हजार, दोन हजार रुपयांच्या फी मधून किंवा संपूर्ण कोर्स मोफत या तत्त्वावर या संस्थांच्या मार्फत शिक्षण दिले जाते. ते आपण घरबसला करू शकतो. ज्याचा कालावधी चार आठवड्यात पासून ते 24 आठवड्यां पर्यंत असू शकतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट तर्फे एक सर्टिफिकेट दिले जाते. काही कोर्समधून तर तुम्ही शिकता शिकता पगार देखील मिळवू शकता.

 

त्याचबरोबर कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकार मार्फत काही जॉब ऑफर देखील केला जातात. यातील काही कोर्स तुम्ही ठरवलेला कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे. तर काही कोर्से तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करू शकता. या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता म्हणजे तुम्ही दहावी किंवा बारावी पास असले पाहिजे किंवा डिग्री, डिप्लोमा शिक्षण कम्प्लीट झालेले पाहिजे.

 

हा कोर्स तुम्ही ऑनलाईन, ऑफलाइन किंवा डिजिटल माध्यमातून पूर्ण करू शकता. या पाच संस्थांच्या मार्फत तुम्ही देशभरातील कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून तुमच्या मातृभाषेमध्ये हे कोर्स पूर्ण करू शकता. त्याचबरोबर हे कोर्स फ्री मध्ये दिले जातात किंवा काही कोर्स मध्ये सर्वात कमी फी घ्यावे लागते. हजार, दोन हजार रुपये आपल्याला ही फी द्यावी लागते. त्याचबरोबर या कोर्समध्ये विशिष्ट स्कॉलरशिप देखील आपल्याला मिळू शकते.

 

त्यातील पहिली संस्था म्हणजे स्वयम. ही संस्था मिनिस्टर ऑफ एज्युकेशन ची एक उपक्रम आहे. या संस्थेमधून तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा कोर्सेस करू शकता. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला असाइनमेंट देखील दिले जातात व उत्कृष्ट शिक्षकांकडून ऑनलाईन प्रकारे शिक्षण देखील दिले जाते. या कोर्सचा कालावधी हा चार आठवड्यांपासून ते 24 आठवड्यांपर्यंत इतका आहे. हा कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा ठरवलेल्या वेळेनुसार दोन्ही पद्धतीने करू शकता. या संस्थेद्वारे आयटी क्षेत्रातील सर्व अभ्यासक्रम, स्पेस मधील सर्वात अभ्यासक्रम, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व अभ्यासक्रम अशा उच्च दर्जाच्या अभ्यासक्रम याद्वारे आपल्याला शिक्षण दिले जातात.

 

या संस्थेद्वारे कोणताही कोर्स जर तुम्ही केला तर तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिला जातो. परंतु जर तुम्ही कोणता कोर्स घेतला आणि त्या कोर्सच्या सर्टिफिकेट साठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेसाठी तुम्हाला एक हजार रुपये ची शुल्क भरावी लागते आणि ही परीक्षा पास होणे सर्टिफिकेट मिळवण्याच्या उद्दिष्टाने खूप महत्त्वाचे मानले जाते. या संस्थेद्वारे जर तुम्हाला शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही swayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्याबद्दलची नोंदणी करू शकता.

 

दुसरी संस्था म्हणजे IGNOU. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. ही एक मुक्त विद्यापीठ आहे. या संस्थेद्वारे मुक्त पद्धतीने शिक्षण दिले जाते. याद्वारे जे शिक्षण दिले जाते ते दोन टप्प्यांमध्ये दिले जाते. ते म्हणजे जून आणि डिसेंबर. या द्वारे तुम्हाला दोन महिन्यांपासून ते तीन वर्षापर्यंतचे वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहे. या संस्थेतून दिल्या जाणाऱ्या काही कोर्सेस ना फी आहेत. त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप देखील दिली जाते. या संस्थेद्वारे तुम्ही काही कोसेस पूर्ण केले तर तुम्हाला हॅलो मेनी म्हणून तुम्हाला स्टेटस मिळून जातो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात नोकरीसाठी अतिशय उपयुक्त करू शकतो आणि तुम्हाला नोकरी सहज उपलब्ध होऊ शकते.

 

तिसरी संस्था जे आहे ते म्हणजे दीक्षा. हा एक एन सी आर टी चा उपक्रम आहे. यामध्ये जर तुम्हाला कोर्स पूर्ण करायचे असतील तर तुम्ही कोणत्याही बोर्डातून दहावी बारावी पास असला तरी चालू शकतो. या मध्ये कोर्स करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांचे असाल तरी चालू शकते, पालक असाल तरी चालू शकते, व्यापारी असाल तरी चालू शकते. या संस्थेद्वारे जितके कोर्सेस तुम्हाला शिकवले जातात त्या सर्व कोर्सेस म्हणून तुम्हाला जॉब हे मिळतील. त्यासाठी तुम्ही दीक्षा वेबसाईटवर जाऊन यासाठी नोंदणी करू शकतात किंवा या संस्थेचे एक स्वतंत्र ॲप आहे त्या ॲप द्वारे देखील या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. या संस्थाद्वारे देखील तुम्हाला गव्हर्मेंट सर्टिफिकेट मिळते. त्याचा वापर तुम्ही कोणतेही जॉब च्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी करू शकता.

 

चौथी संस्था जी आहे ती म्हणजे स्किल इंडिया डिजिटल. या संस्थेच्या माध्यमातून जे काही 36 प्रकारचे कोर्सेस आहेत ते संपूर्ण कोर्स याच्या साह्याने करू शकता. ते देखील कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला करता येतात. तुम्हाला सर्व प्रकारचे कोर्स या संस्थेमार्फत शिकवले जातात. हे कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी आकारावी लागत नाही. त्याचबरोबर एम एस क्यू एफ जे कोर्स आहे ते देखील पोस्ट तुम्हाला या संपूर्ण दिला जातो. हा कोर्स बहुतेक सर्व जॉब साठी विचारला जाणार आहे.

 

पाचवी जी संस्था आहे ती म्हणजे nielit. ही जी संस्था आहे ती इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ची एक उपक्रम आहे. प्रोग्राम,डिग्री, इंटरशिप अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला या संस्थेमार्फत करता येतात. प्रोग्रामिंग, कोडींग याबद्दलची सर्व कोर्स या माध्यमातून दिला जातात. त्याचबरोबर डाटा एन्ट्री सारखे छोटे मोठे कोर्स देखील या संस्थेमार्फत दिले जातात. जर तुम्ही या संस्थेमार्फत कोर्स पूर्ण केले तर तुम्हाला या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्टिफिकेट च्य साह्याने गव्हर्मेंट जॉब देखील उपलब्ध होऊ शकते.

 

अशा प्रकारे हे काही पाच संस्था आहेत. ज्या आपल्याला कमीत कमी फ्री मध्ये किंवा मोफत मध्ये शिक्षण देतात व या शिक्षणाच्या सहाय्याने आपण चांगली नोकरी देखील मिळू शकते.