मित्रांनो आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही बँक जी देशाची मध्यवर्ती बँक म्हटले जाते. या बँकेने आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या इतर बँकांसाठी नवीन नियम चालू केलेल्या आहेत. या नियमांमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत व कोणकोणत्या घटकावर कर आकारला जाणार आहे? या सर्वांबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
रिझर्व बँकेने बँकेत खात्यात असलेल्या शिल्लक रक्कम म्हणजेच मिनिमम बॅलन्स जो आपला अकाउंट मध्ये असतो त्यावर एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आपल्या बँकेच्या सेविंग अकाउंट वर मिनिमम बॅलन्स शिल्लक राखणे हे बंधनकारक होते. जर आपण हा बॅलन्स शिल्लक राखला नाही तर, बँकेकडून आपल्यावर एक विशिष्ट अमाऊंट कर म्हणून आकारले जात होते.
गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेने या कर आकारणीतून जवळजवळ 21 हजार कोटी रुपये मिळवले आहेत. तुम्हाला तरी माहीतच असेल की आपल्या खात्यामध्ये जर मिनिमम बॅलन्स शिल्लक नसेल तर बँक आपल्याला जो कर आकार ते तो कर 400 ते 500 रुपये च्या दरम्यान असतो आणि जर आपल्या बँक खात्यामध्ये एवढी रक्कम शिल्लक नसेल तर आपला बँकेतील बॅलन्स हा मायनस मध्ये जातो.
अशा प्रकारचे अनेक नियम होते. ते रिझर्व बँकेने काही प्रमाणात बदलले आहेत. त्याचबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. पूर्वी आसे होत होती की जे खाते बचत खाते नसून ते शिष्यवृत्तीसाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी जे बचतीसाठी नाही तर शिष्यवृत्ती, पेन्शन अशा कारणांसाठी काढले जात होते. अशा खात्यांवरती जर मिनिमम बॅलन्स शिल्लक नसेल तर तो देखील दंड म्हणून आकारला जात होता.
या नवीन नियमानुसार रिझर्व बँकेने अशा खात्यावर कोणत्याही प्रकारचे दंड आकारले जाऊ नये असे सांगितलेले आहे. त्याचबरोबर हे खाते झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये कन्व्हर्ट केले जावेत असे सांगितलेले आहे. त्याचबरोबर जर तुमचे खाते हे बंद पडले असतील आणि ते खाते चालू करण्यासाठी तुम्हाला जो आधी कर भरावा लागत होता तो कर आता भरावा लागणार नाही.
त्याचबरोबर रिझर्व बँकेने असे देखील त्यांच्या बँकांना सांगितलेले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आर्थिक कारणांमुळे तसेच कोणत्यातरी अडचणीमुळे बँकेमध्ये बॅलन्स मिनिमम बॅलन्स शिल्लक ठेवता आला नाही. तर त्याला सूचना करावी. ती सूचना एसएमएस द्वारे किंवा फोन कॉल द्वारे सांगावे. जेणेकरून तो हा बॅलन्स ठेवू शकेल व त्याला कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाऊ नये.
ही माहिती कळवणे हे बँकेचे कर्तव्य आहे. असे रिझर्व बँकेने सांगितलेले आहे. त्याचबरोबर नवीन अकाउंट काढत असताना एखादा हा हामीदार म्हणून दुसऱ्या व्यक्तीला घेतले जाते. जेणेकरून तो व्यक्ती जर दंड भरला नाही तर त्या व्यक्तीकडून दंड आकारला जाईल.
अशाप्रकारे रिझर्व बँकेने बँकेची बँकेच्या खात्यासंबंधी काही बदल केलेले आहेत. ते बदल सध्या आपल्या बँक खाता मध्ये चालू देखील झालेले आहेत. याची सर्वांनी माहिती घ्यावी.