भारतीयांसाठी टॉप 5 मोफत कार्ड सर्वोत्तम 5 कार्ड लाभ 2024 भारतीयांसाठी मोफत लाभ मिळेल लाखोंचा लाभ…

 

मित्रांनो, केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे. की या योजनेचा लाभ घेऊन सर्वसामान्य लोकांना आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनांबरोबरच काही कार्ड देखील काढण्यात आलेले आहेत. तिच्या कार्डांचा वापर करून आपण अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतो. त्यातील काही पाच कार्ड विषयी आजच्या लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.

 

हे कार्ड कोण कोणते आहेत? या कार्डावर किती लाभ मिळतो आणि कोण कोणते लाभ मिळतात? लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अप्लाय तुम्हाला कसे करावे लागेल? आणि कोण कोणत्या विभागाकडून तुम्ही या कार्डावर लाभ घेऊ शकतात? हे कार्ड खुप महत्वाचे असे कार्ड आहेत, यांच्या विषयी जर पूर्ण माहिती असेल तर तुम्ही या कार्डावर सरकार कडून लाखोंची आर्थिक सहायता घेऊ शकतात. तसेच इतरही खूप फायदे घेऊ शकतात.

 

त्यातील पहिले कार्ड म्हणजे,’किसान क्रेडिट कार्ड’ हे कार्ड शेतकऱ्यांसाठी असते. शेतकरी KCC कार्डवर बँकेकडून लोन घेऊ शकतात. हे जे कार्ड आहे हे बँकेत बनवले जाते. या साठी तुम्हाला csc सेंटर वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर हे कार्ड शेतकऱ्यांना बँकेमार्फत दिले जाते. बँकेत KCC क्रेडीट अकौंट बनवले जाते आणि त्या सोबत शेतकऱ्यांना एक रूपे डेबिट कार्ड दिले जाते. KCC कार्ड बनवल्या नंतर शेतकरी आपल्या गरजेनुसार म्हजेच शेतीच्या कामांसाठी त्यांना जर पैस्यांची गरज आहे तर शेतकरी या KCC कार्डच्या मदतीने बँकेकडून सहज लोन प्राप्त करू शकतात.

 

आणि हे जे लोन आहे हे शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजावर मिळत असते. आणि सोबतच शेतकऱ्यांना सबसिडीचा सुद्धा लाभ मिळतो. जर शेतकरी 1,60,000 पर्यंतचे लोन घेत असतील तर या साठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे जामीन वगैरे लागत नाही. बिना जामीन शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांचे लोन दिले जाते. तसेच शेतकऱ्यांनी जर 3 लाखांपर्यंत लोन घेतले तर त्यांना फक्त 4% व्याज दराने लोन दिले जाते. आणि याच्यात सबसिडीचा लाभही मिळतो.

 

दुसरे जे कार्ड आहे ते म्हणजे ‘बीपीएल कार्ड’ बीपीएल कार्ड जे आहे ते सुद्धा खूपच महत्वाचे कार्ड आहे. हे कार्ड बीपीएल फॅमिली साठी खूप important कार्ड आहे. जे गरीब परिवारातून आहेत त्यांच्या साठी तसेच जे दारिद्ररेषे खालील परिवार आहेत त्यांच्या साठी बीपीएल कार्ड खूप महत्वाचे कार्ड आहे. या लोकांचे हे बीपीएल कार्ड बनवले जाते आणि या कार्ड वर भरपूर योजनांचा लाभ दिला जातो. अनेक फायदे बीपीएल कार्ड वर मिळतात. हे कार्ड गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे कार्ड असते. या कार्डवर तुम्हाला बऱ्याच सुविधा मिळतात. या कार्ड वर मोफत रेशन मिळत असते.

 

जसे की, गहू, तांदूळ, डाळ, खाद्य तेल इत्यादी स्वरूपाचे रेशन फ्री मध्ये दिले जाते. तसेच त्यांचे बीपीएल कार्ड बनले आहे त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहायता सुद्धा दिली जाते. जर त्यांच्या कडे घर नसेल तर घर बनवण्यासाठी सुद्धा यांना सरकारकडून जवळपास 2 लाखांपर्यंतची आर्थिक सहायता मिळते. तसेच बीपीएल कार्डवर तुम्हाला आरोग्य सुविधा सुद्धा मिळतात. तसेच बीपीएल परिवारातील विद्यार्थ्यांना शाळेकडून स्कॉलरशिप दिली जाते. तसेच एडमिशन फ्री दिले जाते. अशा प्रकारे बीपीएल कार्ड वर बरेच लाभ बीपीएल परिवारांना मिळतात.

 

तिसरे जे कार्ड आहे ते म्हणजे ‘कामगार कार्ड’ (लेबर कार्ड) या कार्डला वेगवेळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. परंतु या कार्डवर मिळणारे लाभ सर्व राज्यात सारखेच आहेत. या कार्डवर सुद्धा बरेच लाभ लाभार्थ्यांना मिळतात. सर्व राज्यांमध्ये हे कार्ड कामगारांसाठी बनवले जाते. हे कार्ड श्रमिकांसाठी, कामगारांसाठी, मजदुरांसाठी बनवले जाते. सर्वच क्षेत्रातील कामगार हे कार्ड बनवू शकतात. हे कार्ड अगदी फ्री मध्ये बनवले जाते. प्लंबिंग करणारे कामगार, गवंडी कामगार, बांधकाम कामगार, वेल्डर, मजूर इत्यादी प्रकारचे कामगार या कार्डवर मिळणारे लाभ घेऊ शकतात.

 

कामगार कार्ड बनवल्या नंतर कामगारांना त्यांचे उपकरणे घेण्यासाठी शासनाकडून पैसे दिले जातात. म्हणजेच मजुरांचे जे सामान असते, कामगारांचे जे साहित्ये असते, मिस्त्री लोकांचे साहित्ये हे घेण्यसाठी कामगारांना पैसे मिळतात. तसेच जे कामगार आहेत त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सुद्धा आर्थिक मदत मिळते. कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. 60 वर्षानंतर कामगारांना, श्रमिकांना पेन्शन दिली जाते. असे अनेक फायदे कामगार कार्डवर मिळतात.

 

चौथे कार्ड म्हणजे ‘जॉब कार्ड’ जॉब कार्ड हे सुद्धा अतिशय महत्वाचे असे कार्ड आहे. हे कार्ड मजूर लोकांचे बनविले जाते. हे कार्ड बनवल्या नंतर तुम्हाला शासनाच्या अनेक योजनांचा लाभ हा 100% अनुदानावर मिळत असतो. या कार्डवर आपण शासनाच्या अनेक अशा योजना आहेत ज्यांचा लाभ घेऊ शकतो आणि ते सुद्धा अगदी फ्री मध्ये घरकुल योजनेचा लाभ, अनुदान विहीर, शौचालय योजनेचा लाभ, शेततळे, शेळी पालन, गाय म्हैस अनुदान योजनेच लाभ, फळबाग लागवड, शेवगा लागवड अशा अनेक योजनांचा लाभ जॉब कार्ड वर मिळत असतो.

 

जॉब कार्ड हे तुम्ही अगदी फ्री बनवू शकतात. जॉब कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील रोजगार सेवकाकडे फॉर्म भरून द्यावा लागतो. जॉब कार्ड बनवल्यानंतर मजुरांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजच्या रोज रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला जातो. त्या मोबदल्यात त्यांना चांगल्याप्रकारे मानधन दिले जाते.

 

पाचवे कार्ड म्हणजे ‘आयुष्मान भारत कार्ड’ आयुष्मान भारत कार्ड हे एक आरोग्य साठी खूपच महत्वाचे कार्ड आहे. जर तुमच्या घरात वृद्ध व्यक्ती असतील तर हे कार्ड तुमच्यासाठी वरदान आहे. कारण की, या कार्डवर तुम्हाला कुठल्याही सरकारी किंवा रजिस्टर खाजगी होस्पिटल मध्ये दर वर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार अगदी मोफत मिळतो. आणि जास्तीत जास्त याची गरज जि आहे ती वृद्ध व्यक्तींना असते. वयमानानुसार त्यांचे स्वास्त केव्हाही बिघडू शकते. अशा वेळी आपल्या जवळ पैसे नसले तरी आपण आयुष्मान भारत कार्ड च्या मदतीने त्यांचा फ्री मध्ये इलाज करू शकतो.

 

यासाठी तुम्हाला कुठेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. हे कार्ड तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बनवू शकतात. ऑनलाईन फक्त 5 मिनिटात तुम्ही हे कार्ड बनवू शकता आणि डाऊनलोड करू शकता. एकदाचे हे कार्ड बनवल्या नंतर तुम्ही या कार्डवर सरकारी किंवा रजिस्टर खाजगी होस्पिटल मध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार दरवर्षी मोफत घेऊ शकता. तसेच हे कार्ड तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला कुठलाही हेल्थ इन्शुरन्स वर पैसे खर्च करण्याची गरज नसते. कारण की, आयुष्मान भारत कार्डवरच तुम्ही दरवर्षी 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत घेऊ शकतात. हे कार्ड परिवारातील सर्व सदस्यांचे फ्री बनवता येते.

 

अशाप्रकारे काही पाच कार्ड आहेत. जे भारत सरकारने सुरू केलेली आहे. ज्याद्वारे सर्वसामान्य माणसांना त्याचा खूप मोठा लाभ होऊ शकतो.