पंढरपूरची आषाढी एकादशी २ दिवसांवर आली असतानाच राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. पायी वारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना सरकार पेन्शन देणार आहे. राज्य शासनाने कीर्तनकार व वारकऱ्यांच्या सोयी- सुविधेकरता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. पंढरपूर येथे या महामंडळाचे मुख्यालय असणार असून या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या वृद्धपकाळात पेन्शन देण्यात येणार आहे.
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पहा येथे क्लिक करा