शेतकऱ्यांसाठी खुशखबर  दुष्काळी अनुदान येणार खात्यात तुमचे पैसे घेण्यासाठी लगेच हे काम करा ..

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की भारत सरकार व महाराष्ट्र शासन विविध पद्धतीने शेतकऱ्यांना तसेच आर्थिक दुर्बल असलेला लोकांना सहाय्यक करत आहे. सहाय्य करण्यासाठी ते विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. यातीलच योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेले आहेत. ती म्हणजे दुष्काळी अनुदान देणारी योजना. सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काही अनुदान देण्याचे ठरवले आहे. हे पैसे कसे घ्यावे व कसे मिळवावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

शासनाकडून राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जसे की, पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे, गुरे ढोरांना राचा पाणीची कमतरता, उत्पन्न न झाल्याने वेळेवर कर्ज फेडता आले नाही, त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैस्यांची अडचण अशा अनेक अडचणी त्यांना आल्या आहेत आणि त्यामुळे या दुष्काळी 40 तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा सुद्धा शासनाकडून दिल्या जात आहेत.

त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळी अनुदान, मित्रांनो दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील जवळ जवळ 23 लाख शेतकऱ्यांना 2443 कोटी इतकी रक्कम दुष्काळी अनुदान म्हणून शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. आणि हे दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना मिळावे या साठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले होते. आणि आता या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कृषी तसेच तहसील विभागाकडे उपलब्ध झाल्या आहेत.

या यादींमध्ये जेवढ्या पण शेतकऱ्यांची नावे आहेत त्यासर्व शेतकऱ्यांना kyc करावी लागणार आहे. ही kyc केल्या शिवाय तुम्हाला दुष्काळी अनुदान मिळणार नाहीय. आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल की, आता ही kyc नेमकी कशी करावी? तर, ही kyc करणे अगदी सोपे आहे. ज्या काही दुष्काळी अनुदानाच्या याद्या ह्या तुमच्या गाव पातळीवर आल्या असतील त्यात तुमचे नाव आहे का अगोदर ते पहा. त्यात जर तुमचे नाव असेल तर तुमच्या नावापुढे एक 24 अंकी विशिष्ट क्रमांक दिलेला असेल.

 तो क्रमांक तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि त्या क्रमांकाच्या सहायाने महा ई सेवा केंद्र वर जाऊन kyc करून घ्यायची आहे. त्या ऑनलाईन केंद्रावर फक्त एवढेच सांगायचे आहे की, तुम्हाला दुष्काळी अनुदान घेण्यासाठी kyc करायची आहे, आणि तो विशिष्ट क्रमांक त्यांना द्यायचा आहे. त्या क्रमांकाच्या मदतीने महा ई सेवा केंद्र वाले तुमची kyc लगेच करून देतील. kyc झाल्यानंतर एक दोन दिवसात तुमच्या बँक खात्यावर तुमचे दुष्काळी अनुदान येऊन जाईल. 

अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी kyc न केल्यामुळे त्यांचे अनुदान त्याच्या खात्यात येत नाही. परंतु जो पर्यन तुम्ही kyc करत नाहीत तो पर्यंत तुम्हला दुष्काळी अनुदान मिळणार नाही. म्हणून लवकरात लवकर kyc करून घेणे गरजेचे आहे.परंतु सध्या काही दिवसांपासून kyc करण्याची साईट बंद असल्या मुळे kyc करता येत नाहीये. सर्व्हर डाऊनचा प्रोब्लेम येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना kyc करता येत नाही. म्हणून त्यांचे दुष्काळी अनुदान थांबले आहे, kyc करण्याचे पोर्टल वर काम सुरु आहेत पोर्टल एकदाचे सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना kyc करता येणार आहे, आणि त्यानंतर दुष्काळी अनुदान सुद्धा तुम्हाला मिळून जाईल.

अशाप्रकारे 40 जिल्ह्यांना दुष्काळी अनुदान प्राप्त झालेल्या आहेत. तुम्ही देखील दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी kyc पोर्टलवर तुमचे केवायसी पूर्ण करा. म्हणजे दुष्काळी अनुदान तुमच्या बँकेमध्ये जमा होईल.