सरकार मार्फत शेतकऱ्यांना विविध योजना मिळत असतात. अशातच आता कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांना विशेष कृती या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीच्या बॅगेचा पुरवठा केला जाणार आहे. ज्या लोकांना या फवारणी पंपाचा लाभ घ्यायचा आहे. त्या लोकांनी 6 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. याबाबतची माहिती देखील कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिलेली आहे.
वेळेवर EMI भरूनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा काय आहे कारण
शेतकऱ्यांच्या पिकाला चालना देण्यासाठी त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन आणि इतर तेल यांच्या आधारित असणाऱ्या पिकास चालना देण्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये 100% बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि कापूस साठवण्याचीसाठी बॅग शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
खराब CIBIL स्कोर असेल तरी घरबसल्या मिळवा 40000 रुपयांचे कर्ज : Personal loan सविस्तर माहिती
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या महाडीबीटीत पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तिथे गेल्यावर संपूर्ण माहिती भरावी लागेल. तुम्हाला बियाणे औषधे आणि खते या अंतर्गत कापूस साठवून बॅगसाठी अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण या टाइल्स अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी देखील तुम्हाला अर्ज करता येईल. या योजनेत अंतर्गत आता शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे.