शेतकरी कर्जमाफी योजना : महत्वाची अपडेट : यांना कर्जमाफी तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

शेतकरी कर्जमाफी योजना : महत्वाची अपडेट : यांना कर्जमाफी तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

मित्रांनो, भारत हा कृषिप्रधान देश आहे, आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे साहजिक आहे, जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांमुळे सर्वांना अन्न मिळते आपल्याला माहितच आहे, शेतकरी त्यांच्या शेतात कष्ट करून अन्न-धान्य, भाजीपाला पिकवतो परंतु काही वेळा त्याच्या पिकांना योग्य तो भाव मिळत नाही.

कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी अवकाळी पावसामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन योजना आणली आहे. ज्याचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. तर ही कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे व कोणकोणत्या शेतकऱ्यांना दिल्ली जाणार नाही? याबद्दलची अपडेट आजचा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीने योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती जाहीर केली होती. तसेच याच योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान अनुदान देण्याची घोषणा केली होती. याला सलग तीन वर्ष खंड पाडता उचल केलेल्या पीक कर्जाची परतफेड केली. तेच शेतकरी शासनाने या योजनेसाठी पात्र ठरविले.

तर या संदर्भातील माहिती अद्यापही अनेक शेतकऱ्यांना नसल्याने ते आज ना उद्या प्रोत्साहान अनुदानाचे ५० हजार रुपये खात्यावर जमा होईल, याची प्रतीक्षा करीत आहे. तर शासनाने या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अटी- शर्तीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचविल्याने अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून आता वंचित राहावे लागणार आहे.

राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्त आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. याला आता चार वर्षाचा कालावधी लोटत असला तरी अद्यापही अनेक पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. आज ना उद्या या योजनेचा लाभ मिळेल या भ्रमात शेतकरी आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी. महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा.महावितरण, एस टी महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)

शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25000 पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25000 पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ) इत्यादी सर्वांना या योजने पासून लाभ मिळणार नाही

अशाप्रकारे आजच्या लेखांमध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या अंतर्गत कोणाकोणाला लाभ दिला जातो व कोणा कोणाला लाभ दिला जात नाही. याबद्दलची माहिती पाहिलेली आहे.