लाडकी बहीण : एप्रिलचा हप्ता ‘या ‘ शुभ मुहूर्तावर मिळणार

लाडकी बहीण : एप्रिलचा हप्ता ‘या ‘ शुभ मुहूर्तावर मिळणार

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आता लाडकी बहीण योजना पुन्हा आणि चर्चेत आली आहे. राज्य सरकार मोठ्या कष्टातून तसेच विविध अडचणीतून चालवत असलेल्या लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप महिलांना मिळालेला नाही. यामुळे महिलांमध्ये हा हप्ता कधी येणार याची विचारणा होताना दिसून येत आहे.

याबाबत माहिती देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकताच एक सुतुवॉच केला आहे.

यामध्ये त्यांनी एप्रिलच्या महिन्याची हप्त्याची आता प्रतीक्षा संपली असून सर्व लाडक्या ज्या पात्र आहेत अशा सर्वांना बहिणींना एप्रिल महिन्याचा रुपये पंधराशे चा हप्ता 30 एप्रिल रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर देणार असल्याचे सांगितले.

त्यांनी बोलताना पुढे सांगितले की पात्र महिलांचा आकडा हा ऑक्टोबर 2024 मध्ये 2 कोटी 33 लाख होता मात्र तो 2 कोटी 47 लाख इतका झाला आहे.