ताजी बातमी ऑनलाइन टीम
महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली लाडकी बहिणी योजना सातत्याने विविध कारणात चर्चेत राहत आहे. योजना सुरू झाल्या झाल्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार या घोषणेने राजकीय वातावरण मोठेच तापले. त्यानंतर हे पैसे मिळणार किंवा नाही मिळणार त्यावर चर्चांना उत आले.
Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज
काही दिवसांनी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. महिलांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले. याचा वातावरणात निवडणुका पार पडल्या. अपेक्षित असे यश माहिती सरकारला आलं. मात्र या काळात सरकारने पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास पंधराशे रुपये ऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली.
आता निवडणुका झाल्या निकाल लागले सरकार स्थापन झालं. मात्र अद्याप महिलांना रुपये पंधराशे ही नाही आणि रुपये 2100 ही नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारचं अद्याप नव्हे बजेट जाहीर झाले असल्यामुळे सरकार सध्या तरी लगेच रुपये पंधराशे देऊ शकेल मात्र 2100 रुपये देऊ शकणार नाही अशा मानसिकतेत आहे.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
दरम्यान आता 2100 रुपये राहू द्या पंधराशे रुपये तरी तात्काळ द्या अशी मागणी लाडक्या बहिणीतून होताना दिसून येत आहे. तर याबाबत आता नव्या फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून संक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारी पूर्वी रुपये 3000 लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.
Home Loan : गृहकर्ज: गृहकर्जाचे प्रकार, खरेदी, दुरुस्तीसाठी, बँक, कागदपत्रे वाचा: सविस्तर माहिती
हे जे दिले जाणारे रुपये 3000 असतील हे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे रुपये पंधराशे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. याबाबतचा ठाम निर्णय नुकताच झाल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.