लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आनंदाची बातमी

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

जुलै ऑगस्ट मध्ये सरकारने लाडकी बहीण नावाची एक योजना सुरू केली या योजनेला भरघोस प्रतिसाद लाभला. या योजनेअंतर्गत महिलांना रुपये पंधराशे प्रति महिना त्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले. या योजनेची सुरुवात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

साहजिकच ही योजना विद्यमान सरकारच्या पत्त्यावर पडली. आणि सरकार पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून येऊन सत्तांतर न घडता सत्ताधाऱ्यांकडेच सत्ता ठेवण्यात यशस्वी ठरले. दरम्यान निवडणुकीपूर्वी महिलांना प्रति महिना पंधराशे प्रमाणे पाच महिन्याचे पैसे रुपये सात हजार पाचशे लाडक्या बहिणीच्या खात्यांवर जमा करण्यात आले.

घरबसल्या मिळवा पर्सनल लोन: पॅन कार्ड आधार कार्ड वर कर्ज

आता निवडणुकीनंतर सहाव्या म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होऊ लागले आहेत. त्यांना रुपये 7500 मिळाले त्यांना रुपये पंधराशे मिळत आहेत. तर काही महिलांचा अर्ज सबमिट झाला होता मात्र आधार लिंक किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांना सहा महिन्याचे रुपये पंधराशे प्रमाणे एकदम त्याच्या खात्यावर नऊ हजार रुपये जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अतिशय उत्साहाची वातावरण सध्या आहे.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

तर सुमारे 12 लाख महिलांनी अद्याप बँक खाते लिंक नसल्यामुळे त्याच्या खात्यात पैसे आले नव्हते. त्यांनी खाते लिंक केल्यामुळे त्यांनाही पैसे आता येऊ लागले आहेत. दरम्यान सरकारने आता रुपये पंधराशे ऐवजी 2100 रुपये देण्याची निवडणुकीची काळात घोषणा केली होती. यावर ही महिलांमधून विचारणा सुरू आहे.

येत्या अर्थसंकल्पानंतर हे 2100 रुपये मिळतील असे विविध माध्यमातून समोर आले आहे. मात्र आता त्यात आणखी एक मोठी खुशखबर आहे ती म्हणजे काही मुलांनी अद्याप अर्ज भरले नव्हते आणि त्यांना अर्ज मिळाला नव्हता. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्या महिला आता अर्ज करू शकणार आहेत.

म्हणजेच काय तर लाडक्या बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज करण्याची सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र यासाठी पहिला अर्थसंकल्प होईल त्यानंतर महिलांच्या खात्यावर रुपये 2100 मिळण्याबाबतच्या तरतुदी होतील. आणि यानंतर यापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या अर्जासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आता नव्याने उपलब्ध झाली आहे.