लाडक्या बहिणींना ‘ या’ तारखेला 3 हजार रुपये मिळणार : नवी माहिती : Ladki Bahin July hapta

Ladki Bahin July hapta : गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात घोषणा केली आणि गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून लाडक्या बहिणींना रुपये पंधराशे दर महिन्याला मिळू लागले. ही योजना सुरू करण्या पाठीमागे राज्यातील अनेक आर्थिक दृष्ट्या मागास तसेच कमकुवत महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. या सरकारला ही योजना अतिशय महत्त्वाची देखील ठरली.

पण यात झाले काय तर सरकारने सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे लक्ष ठेवले मात्र अनेक महिलांनी उत्साहाने योजनेसाठी अर्ज भरला आणि त्यांना योजनेचा लाभ मिळण्याची अशा होती. पण ऐनवेळीच्या होऊ घातलेले निवडणुका आणि त्याची तयारी या नादात सरकारकडून ज्या काही महिलांसाठी निकष लावण्यात आले होते त्याची पडताळणी करण्यात आली नाही. यामुळे अनेक अपात्र महिलांनी देखील याचा लाभ घेतला.

नवीन निकष व प्रक्रिया

Ladki Bahin July hapta :  दरम्यान आता जानेवारी महिन्यापासून सरकारने या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी नवीन अटी व निकषांची पडताळणी सुरू केली आहे. या प्रक्रियेत अनेक नवीन बदल देखील करण्यात आले. यामधून नोकरदार महिला तसेच कुटुंबातील कोणी सरकारी नोकरदार किंवा निवृत्तीवेतनधारक असल्यास तर त्या घरातील महिला अशा महिलांना या एचडी पासून वंचित ठेवले जात आहे.

यामध्ये ज्या कोणी महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत होत्या त्यांना या लाडकी बहिण मधून काढून टाकण्यात आले आहे. तर पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा ज्या घराचा लाभ मिळतो त्या घरातील लाडक्या बहिणींना महिलांना आता फक्त रुपये पाचशेच मिळणार आहेत पंधराशे रुपये त्यांना मिळणार नाहीत.

इतकच नाही तर चार चाकी वाहन असणे आणि निश्चित उत्पन्न मर्यादेपेक्षा अटींची अंमलबजावणी केल्यामुळे या योजनेमधून अनेक महिला वगळण्यात येत आहेत.

या महिलांना मिळणार तीन हजार रुपये

Ladki Bahin July hapta :  गेल्या महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये अनेक महिलांना पंधराशे रुपये चा हप्ता मिळाला नाही त्यामुळे अनेक बहिणींना आमचे नाव वगळले की काय आमचे पैसे का बंद झाले अशा अनेक शंका वाढताना दिसत आहेत. याबाबत या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ज्या महिलांना जून महिन्याचे रुपये पंधराशे मिळालेले नाहीत त्यांच्या तक्रारी निराकरणाची काम सुरू आहे.

जना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जून आणि जुलै महिन्याचे मिळून रुपये तीन हजार मिळतील. अशी शक्यता आहे. महिलांच्या दृष्टीने खरोखर खूप गरजेची आणि महत्त्वाची योजना म्हणून ठरले आहे.

Ladki Bahin July hapta : आतापर्यंतचा या योजनेचा पॅटर्न पाहता मागील एक किंवा दोन महिन्याचा हप्ता हा तिसऱ्या महिन्यात दिला जात आहे. या अंदाजानुसार देखील सरकार जुने पैसे ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात येतील. तसेच सरकारने अनेक तांत्रिक सुधारणा देखील केले आहेत की ज्यामध्ये लाभार्थीच्या बँक खात्याची नियमित्वनी तपासणी केली जाते आणि कोणत्याही गैरप्रकारच्या गैरव्यवहाराला नियंत्रण राहते. त्यामुळे विश्वासाहर्ता राहते आणि खऱ्या गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

या योजनेचा चांगला परिणाम महाराष्ट्रावर होईल योजना दीर्घकाळ सुरू राहील आणि महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभेल. सरकारचं म्हणणं आहे की या योजनेसाठी सरकारने पुरेसा निधी तरतूद करून ठेवला आहे. त्यामुळे ही देखील एक लडक्या बहिणी साठी आनंदाची गोष्ट आहे. तथापि ही योजना सुरळीतपणे चालू राहावी आणि हप्ते प्रत्येक महिन्याच्या कोणत्याही एका तारखेला कायमस्वरूपी तीच तारीख ठेवून पैसे मिळावेत अशी मागणी देखील महिलांमधून होत आहे.