आता सर्वसामान्य कुटुंबातील म्हणजेच ज्यांचे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी आहे अशा कुटुंबातील मुलींना एक लाख रुपये मिळणार आहेत हे एक लाख रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. मुलींचा जन्म दर वाढावा, त्यांचे कुपोषण अथवा कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये, मुलींची जन्मास चालना मिळावी यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
या योजनेमार्फत अंगणवाडी सेविकांकडून माहिती दिली जात असून मुलींचा शिक्षणाचा खर्च तसेच मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लागणारा खर्च याला यातून हातभार लागावा हा शासनाचा मोठा हेतू आहे. सरकार ही जी घडणार आहोत या योजनेचे नाव ‘लेक लाडकी योजना’ आहे.
या योजनेअंतर्गत एक एप्रिल 2023 नंतर जमलेल्या मुलींना ही एक लाखाची मुदत देण्यात येणार आहे यासाठी ची सुरुवात नंदुरबार जिल्हा येथून करण्यात आली आहे.
या योजनेनुसार पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, १२ वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेराक्स, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, दाखला, आदी कागदपत्रे लागणार आहेत.
या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेता येते तसेच त्यांच्याकडून अर्ज देखील करता येतो. याबाबतचा अर्ज भरताना आपले आधार कार्ड नंबर तसेच बँक खाते नंबर हा काळजीपूर्वक अर्ज त्यांच्याकडे सबमिट करावा.