P M Kissan : पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख ठरली : ‘या’ दिवशी 4 हजार होणार जमा

P M Kissan : देशातील सर्व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतीची प्रगती करण्यासाठी सन 2019 मध्ये पी एम किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक रुपये सहा हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जातात. आतापर्यंत बारा कोटी हून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

या योजनेद्वारे श्रीमंत तसेच गरीब दोन्ही शेतकऱ्यांसाठी समान पद्धतीने रुपये सहा हजार तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी द्वारे देण्यात येत असल्याने यात कोणताही भ्रष्टाचार होत नाही. तसेच कोणत्याही मध्यस्थी ची देखील गरज लागत नाही.

P M Kissan : आतापर्यंत या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 17 हप्त्यांची वितरण करण्यात आले आहे. या हप्त्यांच्या वितरणामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक जीवन मनात तसेच शेतीच्या प्रगतीत मोठे बदल होताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पुरविण्यास तसेच शेतीच्या कर्जासाठी या निधीचे मिळणारे पैसे उपयोगी ठरत असल्याचे आतापर्यंत दिसून येत आहे.

आता शेतकरी अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. हा हप्ता लवकरच म्हणजेच 5 ऑक्टोंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे. मात्र यावेळी या हप्त्यासाठी सरकारने काही नवे निकष लागू केले आहेत त्यामुळे काही शेतकरी यासाठी पात्र ठरतील तर काही शेतकरी अपात्र देखील ठरू शकतील.

यातील दोन मुख्य निकष हे खालील प्रमाणे आहेत.

पहिला निकष म्हणजे ई केवायसी कम्प्लीट करणे. इ के वाय सी एक डिजिटल प्रक्रिया आहे ज्याद्वारे शेतकरी आपली ओळख शासनाला दाखवू शकतो. यासाठी इ केवायसी पूर्ण करणे गरजेचे असते.

दुसरा निकष म्हणजे जमिनीची व क्षेत्राची पडताळणी : यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीची व क्षेत्राची पडताळणी करण्यात येते या दोन्हींमध्ये काही तफावत आल्यास या योजनेचे पैसे मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

त्यामुळे हे दोन निकष अपूर्ण असल्यास या मिळणाऱ्या अठराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टींची पूर्तता तपासून पहा.