शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये : पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार

ताजी बातमी ऑनलाइन टीम

P M Kissan Yojana: भारत हा एकअतिशयकृषिप्रधान देश असल्याने सरकार शेतीसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी सातत्याने विविध योजना आणत असते. त्यामध्ये काही चांगले बदल देखील करत असते. साहजिकच याच्यातून शेतकऱ्याचे जीवनमान उंच व्हावे. त्याला चांगला फायदा व्हावा हे धोरण सरकार सातत्याने राबवत असते.

यासाठीच सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान नावाची एक योजना सुरू केली आहे याद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये वेगवेगळ्या तीन टप्प्यांमध्ये दिले जात होते. मात्र आता ही रक्कम सरकार वाढवण्याच्या तयारीत लागले आहे.

पी एम किसान योजनेची ही रक्कम आता 6000 रुपयांवरून थेट दहा हजार रुपयापर्यंत करण्याच्या प्रयत्नात सध्या सरकार आहे. याची घोषणा येत्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पापासून करण्यात येईल.

या योजनेची सुरुवात सन 2018 मध्ये करण्यात आली आणि या योजनेद्वारे दर तिमाही रुपये दोन हजार याप्रमाणे सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत आहे.

या योजनेद्वारे सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्ते दिले आहेत. आता 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे. शेतकऱ्याच्या वाढत्या आर्थिक खर्चामुळे सरकार याकडे गांभीरणे लक्ष देत आता पी एम किसान योजनेद्वारे मिळणारे पैसे रुपये सहा हजार वरून थेट दहा हजार रुपये करत आहे.

सरकारकडून अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. पण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. अर्थसंकल्पात अशी घोषणा झाल्यास, कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक करण्यास मदत होईल. तुम्हाला जर या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर, हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 किंवा 155261 वर संपर्क साधता येईल.