PMAY-U 2.0 : प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता : घरासाठी मिळणार अडीच लाख रुपये

ताजी बातमी ऑनलाइन टीम

PMAY-U 2.0 : शहरी तसेच शहरी भागातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे त्यासाठीची मान्यता नुकताच मिळाली आहे. याद्वारे आता घरासाठी रुपये अडीच लाख रुपये मिळणार आहेत. या पहिल्या टप्प्यात एक कोटी नागरिकांना हे अडीच लाख रुपये देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवल्याचे समजते.

PMAY-U 2.0 : या योजनेद्वारे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत घर उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

या योजनेसाठी अर्जदाराचा आधार क्रमांक, आधारनुसार नाव व जन्मतारीख भरणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे चालू बँक खात्याची माहिती , उत्पन्नाचा पुरावा, जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC बाबतीत), आणि जमिनीची कागदपत्रे सादर करावी लागतील. सर्व कागदपत्रे PDF फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे.

PMAY-U 2.0 : या योजनेची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी लाभार्थी आता ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्जासाठी पहिल्यांदा https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये माहिती भरावी लागेल . त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. पात्रतेच्या पडताळणीनंतर सरकारकडून फायनल मान्यता दिली जाते.

PMAY-U 2.0 ही योजना घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या योजनेद्वारे शहरी भागातील गरजू कुटुंबांना स्वतःचे घर मिळवण्याचा मार्ग सोपा होणार आहे .