Post office Monthly Income Ideas : मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की सरकारच्या अगोदर योजना सुरू झालेला आहे आणि या योजनेचा लाभ हा अनेक जणांना झालेला आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या तर्फे देखील म्हणून विशिष्ट योजना निघालेला आहे. ज्यातून आपण चांगले बचत करू शकतो. त्यातीलच एका योजनेविषयीची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना भारत सरकारद्वारे समर्थित आहे आणि ती भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे प्रदान केलेली सेवा आहे. भारतात पैसा वाचवण्याचा आणि व्याज मिळवण्याचा हा एक सुरक्षित मार्ग म्हणून व्यापकपणे ओळखला जातो . मासिक उत्पन्न योजना (MIS) खातेदाराला दरमहा व्याज देते. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर सातत्यपूर्ण परतावा हवा असल्यास, ही तुमच्यासाठी सर्वात विश्वासार्ह योजना आहे. तुम्ही जवळपासच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून पोस्ट ऑफिस एमआयएसचा लाभ घेऊ शकता.Post office Monthly Income Ideas :
मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय आहे. इथं आपले पैसे देखील सुरक्षित आहेत आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते.
या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही एकल किंवा संयुक्त खातं उघडू शकता आणि एकमुखी रक्कम जमा करू शकता. या खात्यात जमा झालेल्या, रकमेनुसार दरमहा तुमच्या खात्यात कमाईची रक्कम येतच राहते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. पण तो पुढे 5-5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करु शकतो.
Post Office योजनेत गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. इथं तुमच्या गुंतवणुकीवर सरकारी सुरक्षेची 100 टक्के हमी आहे. POMIS 7.10% च्या वार्षिक व्याज दरासह 5 वर्षांची मुदत देते . सरकार दर तिमाहीत व्याजदराचा आढावा घेते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर देत नाही.
या योजनेतून चांगलं उत्पन्न मिळतं. ज्या ग्राहकांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळवायचं आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करणं सगळ्यात फायदेशीर आहे. नोकरी सोडल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर एकरकमी रक्कम मिळते. त्यांच्यासाठी ही योजना अतिशय चांगली आहे. एकरकमी गुंतवणुकीद्वारे दरमहा निश्चित उत्पन्न मिळू शकते. या योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे.Post office Monthly Income Ideas :
Post office Monthly Income Ideas : खातं उघडण्यासाठी तुम्हाला आयडी पुरावा द्यावा लागेल. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, डीएल किंवा पासपोर्ट द्यावं लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सुद्धा खातं उघडण्यासाठी महत्त्वाचे आहेत. लाईट बिल, नगरपालिका बिल, निवासी प्रमाणपत्र किंवा शासकीय विभागाने दिलेला अन्य पुरावा असावा. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी चालू तिमाहीत सरकारने वार्षिक व्याज दर 6.6 टक्के निश्चित केला आहे.
म्हणजे जर तुम्ही योजनेत 9 लाख रुपये जमा केले तर या रकमेवरील 6.6 टक्के वार्षिक व्याजदराप्रमाणे एकूण व्याज 59,400 रुपये असणार आहे. जर ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत विभागली गेली तर दरमहा व्याज सुमारे 4950 रुपये असेल. एकाच खात्यातून तुम्ही 4,50,000 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर दरमहा व्याज म्हणून 2475 रुपये कमवाल.
अशाप्रकारे या योजनेतून तुम्ही चांगल्या व्याजदराचा लाभ मिळू शकतात व तुम्ही गुंतवलेल्या पैसे एकदम सुरक्षित असतील.