रेशन कार्ड बंद होणार; मिळणार ‘हे’ नवे कार्ड : सरकारचा मोठा निर्णय

मित्रांनो, भारत सरकार केंद्र सरकारवर, राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना याबाबत असते. या योजनांचा मुख्य उद्देश हा की गरजू व बेरोजगार लोकांना तसेच ज्यांचे आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे अशा लोकांना आर्थिक सहाय्य तसेच विविध प्रकारे सहाय्यता देणे असे आहे. यामध्ये भारत सरकारने मोफत मध्ये शिधा वाटप करण्यासाठी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड ची योजना सुरू केली होती. या रेशन कार्ड ची योजना मध्ये काही बदल करण्यात आलेल्या आहेत. ते बदल आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड हे प्रत्येक भारतीयांकडे असतेच. रेशन कार्ड मध्ये आपला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाव हे गरजेचे असते. कारण या मार्फत आपल्याला विविध योजनांचा देखील लाभ घेता येतो. या रेशन कार्ड आधारे आपल्याला मोफत मध्ये शिधावाटप केली जाते. की ज्यामुळे गरजू लोकांना काही प्रमाणात धान्य दिले जाते. व त्यांना आर्थिक सहाय्य केले जाते. याचं रेशनकार्डाच्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल कोणते? याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाचे असे कागदपत्र आहे. ज्या प्रमाणे मतदान कार्ड आपल्या साठी एक महत्वाचे शासकीय दस्ताऐवज आहे. त्याच प्रमाणे रेशन कार्ड देखील आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचे शासकीय दस्ताऐवज आहे. त्याशिवाय विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा रेशन कार्ड तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे रेशन कार्ड बनवल्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये समाविष्ठ करणे खूप महत्वाचे आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक माहिती समोर आली आहे आणि ती म्हणजे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे. कारण की, सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये महत्वाचे असलेले रेशन आता बंद होणार आहे, आणि त्याच्या जागेवर लाभार्थ्यांना नवीन ई- रेशन कार्ड मिळणार आहे. हे ई-रेशन कार्ड लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. या ई- रेशन कार्डमुळे लाभार्थ्यांना खूप फायदा होणार आहे.

तसेच महत्वाचे म्हणजे रेशन कार्ड मध्ये नवीन नावांची नोंदणी दुरुस्ती करणे तसेच रेशन कार्ड संबधित इतर कामे हे ई रेशन कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, म्हणजेच शेतकरी बांधव, कामगार, मजूर, बेघर स्थलांतरित मजूर, इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण की, अगोदर लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबधित इतर कुठेही काम करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या.

अनेक वेळा एजंट मार्फत ही कामे केली जात होती. खूप जास्त पैसे एजंट लोक घ्यायचे. ते एजंट आपण करा दिलेल्या कामाची गॅरंती देत नव्हते. यामुळे लाभार्थ्यांना अनेकदा खूप मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे हे सर्व प्रकार बंद व्हावेत या साठी अन्न नागरी व पुरवठा विभागाने सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा म्हणजेच ई-रेशन देण्याचा निर्णय घेतला.

यामुळे सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे. रेशन कार्ड ची मागणी खूप जास्त असल्याने तसेच आता सर्वच कामे ही ऑनलाईन झाल्याने आता रेशन कार्ड सुद्धा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. तसेच तुम्ही रेशन कार्ड दुरुस्ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करू शकता. त्यामुळे एजंट लोकांना पैसे देण्याची आवश्यकता सुद्धा नाही.

अशाप्रकारे भारत सरकारने रेशन कार्ड मध्ये काही बदल केलेले आहेत ते म्हणजे रेशन कार्ड बंद करून आता ई रेशन कार्ड चालू होणार आहे. हे रेशन कार्ड कुठल्याही एजंट तर्फे न करता आपण स्वतः काढू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची त्यांना आवश्यकता देखील भासणार नाही.