S T Bus New Scheme : 1200 रुपये भरा आणि वर्षभर फिरा : एसटी बसची नवीन स्कीम

S T Bus New Scheme : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता प्रवाशांसाठी नवीन एक स्कीम सुरू करत आहे. या स्कीम म्हणजेच योजनेद्वारे प्रवाशाला आवडेल तिथे प्रवास करता येणार आहे.

हा उपक्रम 1988 पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राबविण्यात येतो मात्र त्याची लवचिकता आणि सुलभता वाढवण्यासाठी नव्याने काही यात बदल करण्यात आले आहेत. तर या योजनेद्वारे प्रवाशांना कसा फायदा होईल हे आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

या योजनेद्वारे लहान प्रवास किंवा महाराष्ट्रातील चार ते सात दिवसांसाठी प्रवास अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवेचा सर्व प्रकारचा लाभ घेता येतो.

S T Bus New Scheme : 1200 रुपये भरा आणि वर्षभर फिरा : एसटी बसची नवीन स्कीम

या सेवेत नेहमीच बस सेवा, शिवशाही बस सेवा, हिरकणी,रातराणी अशा अनेक नामवंत व सेवेचा लाभ घेता येतो. महाराष्ट्रात जिथे पर्यंत एसटी पोचते तिथे पर्यंत कुठेही प्रवाशांना लाभ घेता येतो. यासाठी कोणत्याही मार्गावर किंवा कोणत्याही सहलींवर आणि संख्येवर बंधन नाही.

आता आपण पाहू पास प्रकार आणि त्याची किंमत…

या योजनेसाठी वयोगटानुसार प्रवाशांसाठी ठरवण्यात आलेली पासची रक्कम खालील प्रमाणे

४-दिवसांचा पास:
नियमित बस: ₹१,१७०
शिवशाही बस: ₹१,५२०

७-दिवसांचा पास:
नियमित बस: ₹2,040
शिवशाही बस: ₹3,030

मुलांसाठी (5 ते 12 वर्षे):
४-दिवसांचा पास:
नियमित बस: ₹५८५
शिवशाही बस: ₹765

७-दिवसांचा पास:
नियमित बस: ₹१,०२५
शिवशाही बस: ₹१,५२०

पाच वर्षापेक्षा अधिक मुलांसाठी तिकीट दर आकारण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

तुम्ही सहलीवर जाणार असाल किंवा चार दिवसाचे विवाह सोहळ्यासाठी जाणार असाल,किंवा व्यवसाय दूरवर जाणार असाल तर अशावेळी या योजनेचा खूप मोठा फायदा प्रवाशांना होऊ शकतो.