Sanjay Gandhi Yojana update
संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडीबीटी प्रणाली द्वारे करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. या योजने अंतर्गत प्राप्त लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणाली द्वारे अनुदान थेट लाभार्थ्याचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या योजनेतील ज्या लाभार्थ्यांची आधारकार्ड अद्यावत नसतील त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही. तरी पेन्शनचा लाभ घेत असलेला लाभाथ्र्यांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्र करून घ्यावेत.
किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधारकार्ड अद्यावत करून घेण्याची कार्यवाही विनाविलंब करावी. अद्यावत झालेले आधारकार्ड. संगांयो कार्यालय इचलकरंजी येथे जमा करावे असे आवाहन अप्पर तहसीलदार सुनील शेरखान यांनी केले आहे.