Sanjay Gandhi Niradhar Yojana :
मित्रांनो नुकताच झालेल्या अधिवेशनामध्ये म्हणजेच दिनांक 18 जुलै रोजी संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग बांधवांना त्यांना मिळत असलेल्या रकमेत एक हजार रुपयाची भरघोस वाढ करण्यात आली. यामुळे त्यांना आता रुपये 2500 मिळणार आहेत. दरम्यान अनेक दिव्यांगांच्या वेगवेगळ्या अडचणी आता समोर येत आहेत.
Sanjay Gandhi Niradhar Yojana : याबाबत दिव्यांग व बांधवांकडून सातत्याने वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत यामध्ये प्रामुख्याने आम्ही दिव्यांग आहोत मात्र संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहोत. आम्ही दिव्यांग आहोत मात्र सावंत बाळविण्याचा लाभ घेत आहोत. आम्ही दिव्यांग आहोत मात्र आम्ही संजय गांधी निराधार योजनेतील या योजनेचा लाभ घेत आहे मग आम्हाला ही दिव्यांगांची वाढीव रक्कम मिळणार का? असा प्रश्न सातत्याने दिव्यांग बांधवांतून उपस्थित करण्यात येत आहे.
आणि जर असे असेल तुम्ही दिव्यांग असताना दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी ही चूक कोणाची प्रशासनाची की आपल्या दिव्यांग बांधवांची या बाबत चर्चा सुरू आहेत. तर याबाबत काय मार्ग काढता येईल याबाबतचे हे सविस्तर आर्टिकल आपण लक्षपूर्वक वाचावे.
आता दिव्यांग बांधवांना वाढीव रक्कम मिळणार आहे. त्यामुळे आपण दिव्यांग असूनही जर इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर सुरुवातीला तहसील कार्यालयात जाऊन या सविस्तर माहिती द्यावी आणि आम्हाला दिव्यांग योजनेत समाविष्ट करायचा आहे. याबाबत काय करावे लागेल असे थेट तेथील कार्यालयातील संबंधित विभागात चौकशी करून माहिती घ्यावी.
Sanjay Gandhi Niradhar Yojana : लाभ तर आपल्याला मिळणार आहेव. मात्र अचानक कागदपत्रांची बदलाबदली केल्याने जी सुरू आहे ती पेन्शन बंद होईल किंवा उशीर होईल अशी काही अडचण होणार नाही ना असे सविस्तर विचारना संबंधित विभागात करून घ्यावी. आणि मगच नंतर आपले पेन्शनची सुरुवात केलेली खाते इतर योजने मधून काढून त्यामध्ये जोडण्यासाठी प्रोसेस सुरू करावी.
याबाबतची प्रोसेस आता आपण समजून घेऊ सुरुवातीला आपण दिव्यांग योजनेसाठी नवीन अर्ज करायचा आहे. अर्जासोबत दिव्यांग प्रमाणपत्र (40% पेक्षा अधिक), आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर सध्या आपण ज्या योजनेतून लाभ घेत आहोत तो बंद करण्यासाठी वेगळा अर्ज इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
अर्ज करताना अर्ज आपण लेखी स्वरूपात केला तरी चालतो आणि जर तेथील प्रशासनाने तुम्हाला ऑनलाईन करावा असं सांगितले तर ऑनलाईन अर्ज करावा. आणि हा अर्ज वडील सांगितली कागदपत्रे आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात सादर करावा.
मात्र हे सर्व करत असताना आपला सुरू असलेला अनुदान कोणत्यातरी कारणाने बंद होईल आणि आहे तोही लाभ मिळणार नाही आणि नवीनही मिळणार नाही असे काही होणार नाही याबाबतची तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. म्हणजेच काय तर यावरची माहिती तुम्ही स्वतः घेऊन त्याप्रमाणे स्वतःच सर्व प्रोसेस करायचे आहे जर आपणाला लाभ मिळून घ्यायचे असतील तर या गोष्टी कराव्या लागतील.
अधिक माहितीसाठी जवळच्या संजय गांधी निराधार योजना कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क साधावा.