Senior Citizens Savings Scheme :ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 31 हजार रुपये : सरकारची घोषणा : – SCSS :

Senior Citizens Savings Scheme 

आजकाल सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने बरेच प्रयत्न करताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच देशाच्या विविध विकासात्मक बाबींकडे सरकार चांगल्या पद्धतीने लक्ष देताना दिसून येत आहे. हा झाला सरकारचा आणि विविध योजनांचा भाग. आता आपण पाहू काय आहे योजना.

भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या औषध पाण्याचा खर्च चालून ते सुखी जीवन जगतील यासाठी ही योजना आणली आहे. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( Senior Citizens Savings Scheme – SCSS) होय.

या योजनेचा नियमित लाभ कसा घेता येईल यासाठी किती व्याज मिळेल? हे आता पाहू…

या योजनेसाठी पोस्ट ऑफिस कडून अतिशय उच्च व्याजदर दिला जातो. जो इतर बँकांच्या देखील तुलनेत खूपच अधिक आहे सुमारे 8.2% व्याजदर दिल्यामुळे हे व्याज भरपूर मिळते.

या योजनेत गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळते. उदाहरण जर पाहिजे झाले जर समजा एखाद्या व्यक्तीने 30 लाख रुपये गुंतवले तर त्याला तीन महिन्याला 61 हजार 500, म्हणजेच प्रत्येक महिला रुपये 20 हजार 500 रुपये उत्पन्न मिळते.

यात गुंतवलेले पैसे पूर्णतः भारत सरकार द्वारे संरक्षित असल्याने कोणत्याही प्रकारचा यात धोका नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यास 80 C अंतर्गत दीड लाखांपर्यंत टॅक्समध्ये सवलत देखील मिळते.

यात पैसे गुंतवल्यास ती साधारणपणे पाच वर्षे ठेवून ठेवता येतात वाटल्यास तुम्ही आणखी तीन वर्षे वाढवू शकता.

यात गुंतवणूक करण्यासाठी पात्रता म्हणजे गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती साठ वर्षांच्या पुढील असावा किंवा त्यापेक्षा कमी असल्यास त्याने 55 ते 60 या दरम्यान स्वेच्छा निवृत्ती घेतलेली असावी. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये ते जास्ती असतीस लाखांपर्यंत रक्कम गुंतवून ज्येष्ठ नागरिकांना भरघोस व्याज मिळवता येते. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये आपण संपर्क साधून माहिती घेऊ शकता.