या लोकांना आता दरवर्षी 10000रु. मिळणार : थेट बँक खात्यात : शासनाची Best योजना 

या लोकांना आता दरवर्षी 10000रु. मिळणार : थेट बँक खात्यात : शासनाची Best योजना

मित्रांनो, आजकाल शासन अनेक योजना राबवत आहे आणि या योजनेचा लाभ लोकांना खूप प्रमाणात झालेला आहे. या योजनेमुळे अनेक लोकांचे आर्थिक परिस्थिती देखील सुधारली आहे. आजच्या लेखांमध्ये आपण दरवर्षी दहा हजार रुपये देणारा योजनेबद्दल ची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना नेमकी कोणती? या योजनेसंबंधीचा सर्व अटी व शर्ती. संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत त्या योजनेचे नाव आहे घरेलू कामगार कल्याण सन्मान धन योजना. या योजना अंतर्गत जे लोक घरेलू कामगार आहेत अशा लोकांना सरकार मार्फत दरवर्षी दहा हजार रुपये दिले जाणार आहे आणि हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये देखील जमा केले जातात. त्याबद्दल चा शासन निर्णय देखील झालेला आहे व त्याचा जीआर देखील आलेला आहे. त्या जीआर मध्ये सांगितल्याप्रमाणे ची माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

शासन अधिसूचना, दि.३ नोव्हेंबर, २०११ अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८ हा अधिनियम दि. ३ नोव्हेंबर, २०११ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दि.१२ ऑगस्ट, २०११ रोजी स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम, २००८ च्या कलम ११ मध्ये ‘वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या परंतु ६० वर्ष पूर्ण केलेली नसतील, अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे.

तरी, सद्यःस्थितीत शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक ८ ऑगस्ट २०१४, दि.०५.०१.२०२३ व दि.२५.०३.२०२३ अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरुपात सन्मान धन योजना, २०२२ राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक ३१ डिसेंबर रोजी वयाची ५५ वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जिवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक ३१ डिसेंबर रोजी वयाची ५५ वर्ष पूर्ण केलेल्या जिवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रूपये १०००/- एवढी रक्कम खालील अटींच्या अधिन राहून बेट त्यांच्या बैंक खात्यात डिवीटीव्दारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

१. यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील.
२. लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य वितरीत करण्यापुर्वी सदर लाभार्थी जिवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त (असंघटित कामगार) कार्यालयाने खात्री करुन घेण्यात यावी.
३. अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत, त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम १५(३) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखाना देखील तंतोतंत लागू राहील, याचा उल्लेख करावा.
४. सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टीकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सा कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.
५. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा.
६. वरील कार्यपध्दतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त (असंघटित कामगार यांनी करावे.

अशाप्रकारे या योजनेसंबंधीचा जीआर मध्ये माहिती सांगितलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून जीआर देखील पाहू शकता. https://drive.google.com/file/d/1vh6I6U5eGILZUSzXiWRpn2vrH3zaNund/view?usp=sharing