पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त एकदा पैसे भरा आणि दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

महिन्याला ठराविक तारखेला खात्यात ‘पगार’ जमा झाला की कसं छान वाटतं ना? पण निवृत्तीनंतर किंवा हाताशी नोकरी नसताना हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

 

शेअर बाजारातली अनिश्चितता आणि बँकांचे कमी होणारे व्याजदर यामुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झालाय. पण आता काळजी नको, कारण पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) तुमच्या मदतीला धावून आली आहे. विशेष म्हणजे इथे तुमचे पैसे १०० टक्के सुरक्षित राहतात आणि महिन्याला फिक्स रक्कमही मिळते.

 

सध्याच्या काळात रिटायर्ड झालेले ज्येष्ठ नागरिक असो किंवा घरात काटकसर करून पैसे वाचवणाऱ्या गृहिणी, प्रत्येकाला एक हक्काचं उत्पन्न हवं असतं. पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला एकदाच एकरकमी पैसे गुंतवायचे आहेत आणि त्यानंतर पुढील ५ वर्ष तुम्हाला दरमहा व्याज मिळणार आहे. सध्या या योजनेवर ७.४ टक्के इतका जबरदस्त व्याजदर मिळतोय, जो अनेक बड्या बँकांच्या एफडीपेक्षा जास्त आहे.

 

Post Office MIS Scheme

 

जर तुम्ही वैयक्तिक (Single Account) खातं उघडून त्यात ₹९ लाख गुंतवले, तर ७.४ टक्के व्याजाच्या हिशोबाने तुम्हाला वर्षाला ६६,६०० रुपये मिळतात. म्हणजेच, दर महिन्याला तुमच्या हातात ₹५,५५० खणखणीत जमा होतील. पाच वर्षांची मुदत संपल्यावर तुमची मूळ रक्कम (९ लाख) तुम्हाला जशीच्या तशी परत मिळते. म्हणजेच सोन्याहून पिवळं!

 

तुम्हाला लाखो रुपयेच गुंतवले पाहिजेत असं काही नाही. तुम्ही अगदी १ हजार रुपयांपासूनही सुरुवात करू शकता. एका व्यक्तीला जास्तीत जास्त ९ लाख रुपये, तर पती-पत्नी मिळून जॉइंट खातं उघडल्यास ₹१५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. जॉइंट अकाउंटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला मिळणारी रक्कम आणखी वाढते.

 

दुसरीकडे, ही योजना पूर्णपणे सरकारी (Govt Schemes) असल्याने शेअर बाजारातील चढ-उताराचा यावर काहीही परिणाम होत नाही. तुमचे पैसे बुडण्याची भीती नसते. शिवाय, गरज पडल्यास तुम्ही वारसदार (Nominee) सुद्धा नेमू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, यातून मिळणारं व्याज हे करपात्र (Taxable) असतं. त्यामुळे सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासाठी हा पर्याय बेस्ट मानला जातोय.