मित्रांनो, पोस्ट ऑफिस ची गुंतवणूक नक्कीच सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे प्रत्येक जण पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक करणार तत्पर असतात. म्हणूनच आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका अशा योजना बद्दलची माहिती पाहणार आहोत की जी योजना अंतर्गत पती-पत्नीला दर महावीस हजार रुपये मिळवून देते.
कोरोना काळामध्ये झालेल्या बेरोजगारीमुळे अनेक गरीब नागरिकांचे जगणे मुश्किल झाले होते. आणि याच कारणामुळे आता अनेकजण गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. आपल्याला जर बाजारात कुठे जायचे असेल तर आपल्याकडून 500 रुपयांची नोट सहज खर्च होऊन जाते. पूर्वी केवळ 100 रुपये पुरेसे होते. इतकी महागाई वाढली आहे. यामुळे आता सर्वजण गुंतवणुकीकडे वळले आहेत. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम या लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
त्यावर 8 टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. यामध्ये गुंतवणुक केल्यास दरमहा 20,000 रुपये कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकते. सरकारने 1 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी POSSC योजनेसाठी 8.2 टक्के व्याज दर देऊ केला आहे. या योजनेत खाते उघडून 1000 ते 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली जाऊ शकते. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी असेल तर ही योजना घेता येईल.
यामध्ये 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती पती-पत्नीसोबत संयुक्त खाते उघडू शकते. आणि या योजनेतून पती-पत्नी दर महिन्याला 20 हजार रुपये पेन्शन मिळवू शकतात. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राबवत आहे. या योजनेत फक्त 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक पैसे गुंतवू शकतात. याशिवाय 55 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांवरील व्हीआरएस घेणारे लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणूकदार यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
म्हणजेच ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरचे पैसे सरकारच्या या योजनेत गुंतवू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत सूट मिळेल. मात्र, व्याज उत्पन्नावरील कर एका मर्यादेनंतर भरावा लागेल. सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे या उद्देशाने पोस्ट ऑफिसची ही योजना 60 वर्षे वयाच्या लोकांसाठी बनवण्यात आली आहे. ही योजना व्हीआरएस घेतलेल्यांसाठीही आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत सरकार सध्या 8.2 टक्के दराने व्याज देत आहे. योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रितपणे 5 लाख रुपये जमा केल्यास त्यांना प्रत्येक तिमाहीत 10,250 रुपये मिळू शकतात.
पाच वर्षात तुम्हाला फक्त व्याजातून 2 लाख रुपये मिळतील. तुम्ही तुमचे निवृत्तीचे पैसे म्हणजे जास्तीत जास्त 30 लाख रुपये यामध्ये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 2,46,000 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मासिक आधारावर 20,500 रुपये आणि तिमाही आधारावर 61,500 रुपये मिळतील. या योजनेचा कालावधी हा पाच वर्षांचा आहे. परंतु तुम्हाला काही अडचण असल्यास आणि कालावधी पूर्ण होण्या आधीच जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला तुमच्या रकमेच्या दीड टक्के रक्कम तुम्हाला कट करून दिली जाते.
अशाप्रकारे ही पोस्ट ऑफिस ची ज्येष्ठ नागरिक सेविंग स्कीम आहे. ज्या अंतर्गत 20 हजार रुपये दर महा मिळू शकतात.