लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

मार्च एप्रिल आणि मे महिन्यांचं हप्त्याचं काय? असा प्रश्न आता महिला विचारत आहेत. (women)याबाबतच पुढच्या काही तासांत मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे.लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात शेवटचा हप्ता मिळाला होता. मात्र, आता तीन महिने उलटून गेले आहेत. पण पुढचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. (women) त्यामुळे मार्च एप्रिल आणि मे महिन्यांचं हप्त्याचं काय? असा प्रश्न आता महिला विचारत आहेत. याबाबतच पुढच्या काही तासांत मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे.महत्त्वाचे म्हणजे ३० एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपली आहे. आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याच सांगितलं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अवघ्या काही तासांत ही बैठक होणार आहे.

 

काही महिल्यांना तर जानेवारीपासूनचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे आपला अर्ज बाद झाला आहे का? अशी भीती या महिलांना सतावत आहेत.याबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या महिलांना ५००० ते ६५०० रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार अशी चर्चा आहे. (women) तसेच मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.दरम्यान, राज्यातील सुमारे ५४ लाख महिलांचा या योजनेचा लाभ बंद झाला आहे. ई केवायी न केल्याने तसेच निकषात न बसणाऱ्या या योजनेतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता केवळ १ कोटी ८९ लाख पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे.या निर्णय़ानंतर सरकारचे १२०० कोटी रुपये वाचणार आहे. आता उर्वरित महिलांना तीन महिन्यांचा लाभ कधी मिळणार याची उत्सूकता सर्वांना लागली आहे.