सध्याच्या काळामध्ये गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय म्हणून LIC आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे पाहिले जात आहे. कारण की सुरक्षित गुंतवणूक आणि उत्कृष्ट परतावा देणाऱ्या स्कीममध्ये एलआयसी आणि पोस्ट ऑफिस केंद्रस्थानी आहे.
परंतु, अनेकवेळा या दोन्ही पर्यायांमधील नेमका कोणता पर्याय निवडावा?? यामध्ये गुंतवणूकदारांचा गोंधळ उडताना दिसतो. तसेच कोणत्या पर्यायात सुरक्षितेची हमी दिली जाते? हा प्रश्न देखील सतत विचारला जातो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या दोन्ही पर्यायांमधील फरक सांगणार आहोत.
पोस्ट ऑफिसच्या स्कीमचे फायदे(Post Office Scheme)
पोस्ट ऑफिसकडून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे विविध 9 पर्याय दिले जातात. ज्यात तुम्ही वार्षिक 8 टक्के व्याज मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये बचत खाते, टाइम डिपॉझिट खाते ते SCSS, PPF, KVP, NSC, MIS आणि सुकन्या समृद्धी खाते (SSY) उघडता येते. या खात्यांमध्ये तुम्हाला 8 टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांची स्वतः सरकार हमी घेते. सध्याच्या घडीला पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना लोकप्रिय ठरत आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा समावेश आहे.
एलआयसीच्या स्कीमचे फायदे(LIC Scheme)
सध्याच्या घडीला गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून एलआयसीकडे देखील पाहिले जात आहे. एलआयसी चांगल्या परताव्यासह सुरक्षतेची हमी देखील देते. LIC मध्ये मनीबॅक, गॅरंटीड बोनस आणि डेथ बेनिफिट्स सारखे अनेक फायदे देखील मिळतात. इतर बचत पर्यायांच्या तुलनेत एलआयसी जोखीममुक्त आहे. तुम्हाला जर कमी कालावधीत अधिक नफा हवा असेल तर एलआयसी तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. सध्या नवीन जीवन आनंद, जीवन उमंग, एलआयसी जीवन अमर, टेक टर्म प्लॅन या स्कीम सर्वात लोकप्रिय आहेत.