मोफत टॅब्लेट योजना 2024 फॉर्म अर्ज ऑनलाइन नोंदणी : टॅब्लेट योजना महाराष्ट्र शासन 2024

मित्रांनो, केंद्र सरकार तसेच सर्व राज्यातील सरकार आपल्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवित असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच शासन वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र आहे.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वितरित करण्यात येतात. सोबत प्रतिदिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात. त्यामुळे अशा कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात. त्यामुळे ते आपल्या नातेवाईकांकडून तसेच साहुकाराकडून पैसे उधार घेऊन आपल्या मुलांना कसेबसे इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण देतात. कारण इयत्ता 10वी च्या पुढील इंजिनियरिंग, मेडिकल MHCET / IEL / NEET शिक्षण खूप महाग असते.

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती

त्यासाठी कोचिंग क्लास ची सुद्धा गरज असते आणि अशा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते. जे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाना पैशाच्या दृष्टीने परवडण्यासारखे नसते. त्यामुळे शिक्षणाची इच्छा असून सुद्धा राज्यातील बहुतांश विद्यार्थी पैशा अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १०वी पास करून मेडिकल/इंजिनियरिंग मध्ये प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना MHCET / IEL / NEET च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग देते परंतु ऑनलाईन कोचिंगसाठी टॅबलेट व इंटरनेट ची गरज असते.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

परंतु आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला टॅबलेट तसेच इंटरनेट कनेक्शन घेणे शक्य नसते. त्यामुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना MHCET / IEL / NEET च्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग पूर्ण करता यावे यासाठी मोफत टॅबलेट उपलब्ध करून दिला जातो व सोबत प्रतिदिवस 6 जीबी इंटरनेट ची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. जेणेकरून अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागू नये. आजचे युग हे डिजिटली युग आहे प्रत्येक क्षेत्रात आज डिजिटलीकरणाचा वापर वाढत चालला आहे. आज शिक्षण क्षेत्रात सुद्धा डिजिटलीकरणाचा वापर वाढला आहेत. आज शिक्षण उपयोगी सर्व पुस्तके तसेच इतर गोष्टी ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे टॅबलेट नसतो. त्यामुळे त्यांना ऑनलाईन पुस्तकांचा तसेच शिक्षण उपयोगी इतर गोष्टींचा लाभ घेणे शक्य होत नाही.

आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील इंजिनियरिंग तसेच मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास साठी मोफत टॅबलेट वितरण करणे. जेणेकरून विद्यार्थी ऑनलाईन स्वतःचे कोचिंग शिक्षण पूर्ण करू शकतील.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील इंजिनियरिंग तसेच मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास उपलब्ध करून दिले जातात व त्यांना या ऑनलाईन कोचिंग क्लास चा लाभ घेता यावा यासाठी मोफत टॅबलेट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणे

विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ देणे

विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

 

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी टॅबलेट विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना MHCET / IEL / NEET च्या पूर्वतयारीसाठी मदत करणे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील ईमाव (OBC), वीजभज (VJNT), विमाप्र (SBC) वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील इयत्ता 10वी उत्तीर्ण करून इयत्ता 11वी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच प्रति दिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक गुण हे इयत्ता 10वी शहरी भागातील विद्यार्थी 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.इयत्ता 10वी ग्रामीण भागातील विद्यार्थी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.योजनेसाठी आवश्यक पात्रता या अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता 10वी उत्तीर्ण करून इयत्ता 11वी मध्ये सायन्स विषयात प्रवेश घेतलेला असावा.

 

योजनेच्या अटी या महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.अर्जदार विद्यार्थ्यांने इयत्ता 10वी उत्तीर्ण होऊन इयत्ता 11वी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.

अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

 

अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.जर विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण मध्येत सोडले तर अशा विद्यार्थ्यांकडून टॅबलेट परत घेतला जाईल. टॅबलेट ची 1 वर्षाची वॉरंटी दिली जाईल परंतु 1 वर्षानंतर टॅबलेट मध्ये बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची असेल त्यासाठी शासनाकडून दुरुस्ती देखभाल खर्च दिला जाणार नाही. टॅबलेट सोबत लाभार्थी विद्यार्थ्याला प्रति दिवस ६ जीबी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्या व्यतिरिक्त कुठलेच सब्स्क्रिपशन उपलब्ध करून दिले जाणार नाही. अशाप्रकारे या काही या योजनेच्या अटी आहेत.

 

योजनेअंतर्गत अर्ज OBC (इमाव) VJNT (विजाभज)

SBC (विमाप्र) या प्रवर्गातील विद्यार्थी करू शकतात. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी पुरावा (वीजबिल,घरपट्टी,भाडेपावती),

इयत्ता 10वी उत्तीर्ण मार्कशीट,इयत्ता 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र,विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला,विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला,

नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट,विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो,विद्यार्थ्यांचे ई-मेल आयडी, मोबाईल नंबर,बँक खात्याचा तपशील,

 

या योजनेचा अर्थ करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या https://mahajyoti.org.in/en/home/अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.होम पेज वर गेल्यावर Upcoming Event खाली MH-CET /JEE / NEET नोंदणी खाली Read More बटण दिसेल त्याला क्लिक करावे लागेल.आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर Click Here For Registration या Option वर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारले सर्व माहिती भरावी लागेल म्हणजे सर्व पुरावे अपलोड करावे लागतील (उदाहरणार्थ Photo, Signature, Leaving Certificate, Cast Certificate, Bonafid Certificate) सर्व माहिती भरून झाल्यावर Upload वर क्लिक करावे. Upload Option वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमची महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.अर्ज केल्यानंतर थोड्या दिवसांनी महाज्योती संस्थेतर्फे अर्जदार विद्यार्थ्याला मोबाईलवर तसेच ई-मेल आयडी वर संपर्क करण्यात येईल.

 

अशा प्रकारे तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.