ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 1500 रु. थेट बँक खात्यात… राज्य शासनाच्या बेस्ट योजना…

मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की आपल्या भारतामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेला आहे. या योजनांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी यांच्यासाठी देखील योजना चालू करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी वेगळा योजना चालू करण्यात आला आहे. आर्थिक दुर्बळ असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना चालू करण्यात आलेला आहे.

त्याच बरोबर जेष्ठ नागरिकांसाठी देखील अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. या योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना काही अर्थसहाय्य केले जाते. त्यांना आर्थिक मदत केली जाते. ज्येष्ठ नागरिकांना चालू करण्यात आलेल्या योजना कोणकोणत्या आहेत? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळपास एक कोटी इतकी आहे. कुटूंबात मिळणाऱ्या सोयी सुविधा, आधुनिक उपचार पध्दती, वैद्यकीय सुविधा, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे आयुष्यमान वाढत आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने तरुण वर्ग व्यवसाय, नोकरी निमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे व एका शहरातून दुसऱ्या शहराकडे स्थलांतरीत होत आहे.

त्यामुळे स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटूंब पद्धती रुढ होत आहे. शहरात महागाई, राहण्यासाठी छोटी जागा या कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी व अधिकार यांची जाणीव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना व्हावी, म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी योजना राबविण्यात येतात.

त्यातील पहिली योजना म्हणजे ‘वृद्धाश्रम’ योजना. अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा. म्हणून राज्य शासनाने 20 फेब्रुवारी 1963 अन्वये वृद्धाश्रम ही योजना सुरु केलेली आहे. ही वृद्धाश्रमे स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्त्वावर चालविली जातात. आतापर्यंत शासन मान्यताप्राप्त 32 वृद्धाश्रमे अनुदान तत्वावर सुरू आहेत.

या वृद्धाश्रमामध्ये निराधार, निराश्रित व गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येतो. वृद्धाश्रमामध्ये प्रवेशितांना निवास, अंथरुण- पांघरुण, भोजन, वैद्यकीय सुविधा, मनोरंजनाच्या सोयी मोफत पुरविण्यात येतात. वृद्धाश्रमामध्ये 60 वर्षे वयावरील पुरुष व 55 वर्षे वयावरील स्त्रियांना मोफत प्रवेश देण्यात येतो. गरजू ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांच्याकडे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.

दुसरी योजना म्हणजे ‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना ‘वृद्धाश्रम’ योजनेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये काही अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात.उदा. बाग-बगीचा, वाचनालय, दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी सुविधा, बैठे खेळ इत्यादी, म्हणून सर्व सोयींनी युक्त असे ‘मातोश्री वृद्धाश्रम’ ही योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन 17 नोव्हेंबर, 1995 रोजी स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरु करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत शासनाने 31 जिल्ह्यांमध्ये 5 एकर जागेवर सुसज्ज मातोश्री वृद्धाश्रम बांधलेले असून हे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थामार्फत विनाअनुदान तत्त्वावर सुरु करण्यात आले आहेत. राज्यात सद्यस्थितीत ’23 मातोश्री वृद्धाश्रम’ सुरु असून प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची प्रवेशितांची संख्या 100 इतकी आहे. त्यामधील 50% जागांवर शुल्क भरुन व 50% जागांवर विनाशुल्क प्रवेश देण्यात येतो.

तिसरी योजना म्हणजे ‘संजय गांधी निराधार’ योजना. या योजनेंतर्गत निराधार, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिला यांच्याबरोबर निराधार व आर्थिकदृष्ट्या मागास वृद्ध नागरिकांनाही लाभ देण्यात येतो. त्यांना प्रती महिना 1000 रूपये देण्यात येतात. आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे यामध्ये नागरिकांना प्रति महिना 1500 रुपये दिले जातात.

चौथी योजना म्हणजे श्रावणबाळ योजना (राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना) या योजनेंतर्गत 65 वर्षावरील स्त्री आणि पुरुष जेष्ठ नागरिक यांना लाभ देण्यात येतो. योजनेंतर्गत राज्य शासनाचे रुपये 400/- व केंद्र शासनाचे 200/- असे एकूण 600/- इतके अर्थसहाय्य प्रतिमहा देण्यात येते. ही योजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राबविण्यात येते.

पाचवी योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना. या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील दारिद्र्यरेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो. योजनेंतर्गत राज्य शासनाचे रुपये 400/- व केंद्र शासनाचे 200/- असे एकूण 600/- इतके अर्थसहाय्य प्रतिमहा निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येते. ही योजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राबविण्यात येते.

अशाप्रकारे या काही योजना आहेत की ज्या अंतर्गत जेष्ठ नागरिकांना काही प्रमाणात प्रति महिना अर्थसहाय्य केले जाते. त्यांना आर्थिक मदत केली जाते.