मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, आपला भारत देश हा झपाट्याने विकसित होत आहे या विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी देशातील कामगार वर्ग आणि मेहनती श्रमिकांचा खूप मोठा वाटा आहे. त्याप्रमाणे या श्रमिकांची देशातील लोकसंख्याही लक्षणीय आहे.
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या मजुरांना जीवन जगताना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.अशा मजुरांच्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येते. त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
शेतकऱ्यांसाठी काय आहे PM आशा योजना?; सरकारने मंजूर केला 35,000 कोटींचा निधी
देशातील अशा गरीब आणि मेहनती वर्गाला आर्थिक सुरक्षितता मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने 2020 मध्ये कामगारांसाठी ई-श्रम पेन्शन योजना सुरू केली आहे. केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांसाठीच नवनवीन योजना राबवत नाही तर त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठीही योजना राबवल्या जातात. अशा कामगारांना आता ई-श्रम कार्डच्या माध्यमातून योजनांचा लाभ तर मिळणार आहेच.
जेष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या अटी
पण सर्व असंघटीत कामगारांचा डाटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कामगारांच्या सुविधांसाठी ही योजना राबवली जात आहे.
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या ‘लखपती दीदी’ योजना आहे तरी काय?
ई श्रम कार्ड योजना 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना एक Unique ID नंबर (UAN) दिला जातो. 2024 मध्ये, सरकारनं या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता, ई श्रम कार्डधारकांना दरमहा ₹3000 पेंशन मिळणार आहे. ई श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये दरमहा याप्रमाणे पेन्शन दिले जाणार आहे, म्हणजेच 36 हजार रुपये वार्षिक पेन्शन या लाभार्थ्यांना ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत दिली जाते. त्याचबरोबर ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत लाभार्थीला 2 लाख रुपयांचा अपघात विमा देखील मिळतो.
‘कृषी कर्ज मित्र योजना’ : शेतकऱ्यांना आता लवकर कर्ज मिळणार : पहा सविस्तर
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचे व्यापक उद्दिष्ट देशभरातील सर्व श्रम कार्डधारकांना त्याचा लाभ पोहोचवणे, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देणे आणि उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करणे हा आहे. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेत नावनोंदणी केलेल्या सहभागींना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹ 3000/- ची निश्चित मासिक पेन्शन मिळेल, जे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात उत्पन्नाचा एक स्त्रोत प्रदान करेल. या योजनेद्वारे, ई-श्रम कार्डधारकांना ₹ 36,000/- चे एकूण वार्षिक आर्थिक सहाय्य मिळेल, ज्यामुळे शाश्वत वाढ सुलभ होईल आणि आर्थिक सुरक्षिततेची भावना मिळेल.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
शिवाय ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेत सहभागी होऊन, व्यक्ती खात्री बाळगू शकतात की त्यांची सामाजिक आर्थिक प्रगती आणि एकूणच कल्याण यांना प्राधान्य दिले जाईल, ज्यामुळे सर्व सहभागींचा सर्वांगीण विकास आणि जीवनाचा दर्जा चांगला होईल. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी पात्र होण्यासाठी, व्यक्ती संघटित क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार हा 18 ते 40 वयोगटातील असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे मासिक उत्पन्न हे ₹ 15,000 पेक्षा जास्त नसावे, याची खात्री करून कमी उत्पन्न असलेल्या लोकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, ई श्रम कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक पासबुक {आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक}
ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे. आता तुमच्या समोर वेबसाइटचे होमपेज उघडेल. होम पेजवर तुम्हाला Schemes हा पर्याय दिसेल. यावरती क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला PM-SYM च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच, योजनेशी संबंधित माहिती तुमच्या समोर येईल. आता तुम्हाला या पेजवरील Login पर्यायावर क्लिक करायचे आहे.
तुम्ही क्लिक करताच, तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला Self Enrollment या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक टाकायचा आहे आणि Proceed या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल जो तुम्हाला तिथे भरायचा आहे.
महिलांसाठी 50 विविध योजना : जाणून घ्या लाभ, अर्ज, कागदपत्रे सविस्तर माहिती
आता तुमच्यासमोर ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा अर्ज उघडेल. तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे. सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील. शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुम्ही सबमिट पर्यायावर क्लिक करताच, तुम्हाला अर्जाची पावती मिळेल.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लाखाचे झटपट कर्ज उपलब्ध : तेही घरबसल्या मिळवा Personal loan
ऑफलाइन पद्धति ने अर्ज करने साठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्रात म्हणजेच CSC केंद्राला भेट द्यायची आहे. तिथे गेल्यानंतर, तुम्हाला तेथील व्यक्तीला ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सांगायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमची महत्त्वाची कागदपत्रे कंडक्टिंग ऑफिसरकडे जमा करावी लागतील. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी तुमचा अर्ज CSC केंद्राच्या ऑपरेटरद्वारे केला जाईल. अर्ज केल्यानंतर, तुम्हाला एक पावती दिली जाईल, त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला काही विहित शुल्क भरावे लागेल.
ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार
अशा प्रकारे शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.