Tractor Anudan : आजकाल सर्वत्र यांत्रिकीकरणाचा वापर करण्यात येत आहे. हा वापर शेतीमध्येही मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात वाढला आहे. शेतकरी लोकही यांत्रिकीकरणाचा वापर करून अनेक यंत्रांमार्फत शेती पिकवण्यासाठी वापर करत आहे. याचा चांगला परिणाम देखील होत असून शेतकऱ्यांना कमी कष्टात चांगला लाभ मिळत आहे.
सरकार करणार मुलींच्या लग्नाचा खर्च; जाणून घ्या नवी योजना आणि पात्रता
Tractor Purchase Scheme : हा सर्व अभ्यास करता कृषी यांत्रिकीकरण एक महत्त्वाचा मोठा पाऊल टाकणारा भाग आहे. याचा विचार करत सरकार सातत्याने शेतीसाठी विविध योजना आणत आहे आणि यामध्ये यांत्रिकीकरणाला देखील प्राधान्य देत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकरी कुठेही न हात पसरता शासन देत असलेल्या विविध अनुदानाचा लाभ घेऊन अधिक सक्षम बनेल असे अनेक निर्णय शासन सध्या घेत आहे.
HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज
आता एक मोठी बातमी याविषयी एक समोर आली आहे ती म्हणजे सरकार कृषी यांत्रिकीकरणासाठी 27 कोटी 75 लाखाचा निधी वितरण करत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी काय आहे PM आशा योजना?; सरकारने मंजूर केला 35,000 कोटींचा निधी
ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान : Tractor Anudan :
कृषी यांत्रिकीकरनाचा एक भागम्हणून सरकार आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्यास सुरुवात करत आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान किंवा एक लाख 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम यापैकी जी कमी असेल ती रक्कम देणार आहे.
बाईक अपघातात विमा कसा मिळवू शकता? इन्शुरन्स क्लेम करण्याची संपूर्ण प्रोसेस
तर इतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीच्या 40% अनुदान किंवा एक लाख रुपये पेक्षा कमी जी रक्कम असेल ती देणार आहे. यामुळे आता सर्वच शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवू शकतात.
कृषी यांत्रिकीकरणासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. हि रकम डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागात चौकशी करून संबंधित माहिती घ्यावी.