LIC ची जबरदस्त योजना, दरमहा मिळणार पेन्शन

देशाची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही दरमहा पेन्शन(pension) प्राप्त करु शकतात. एलआयसीच्या या नवीन योजनेचे नाव स्मार्ट पेन्शन योजना आहे. ही योजना एक बचत आणि पेन्शन योजना आहे जी वैयक्तिक आणि एकापेक्षा जास्त ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे.

 

या योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शन मिळू शकते. याच बरोबर या योजनेत मृत्यू लाभ, वेगवेगळे पेन्शन(pension) पर्याय आणि गरज पडल्यास कर्ज घेण्याची सुविधा देखील एलआयसीकडून देण्यात येत आहे. एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत तुम्हाला एकाच वेळी पैसे जमा करावे लागतात आणि नंतर तुम्हाला दरमाहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शन मिळू शकते. या योजनेत 18 ते 100 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करु शकते.

 

स्मार्ट पेन्शन योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचे पेन्शन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामध्ये एक म्हणजे सिंगल लाइफ अॅन्युइटी आणि दुसरा म्हणजे जॉइंट लाइफ अॅन्युइटी. सिंगल लाइफ अॅन्युइटीमध्ये पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत फक्त त्यालाच पेन्शन मिळते. तर जॉइंट लाइफ अॅन्युइटीमध्ये पॉलिसीधारकासह, जोडीदाराला देखील पेन्शन मिळते.

एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत ग्राहकांना दरमहा 1000 दर तीन महिन्यांनी 3000 रुपये, दर सहा महिन्यांनी 6000 रुपये आणि प्रति वर्ष 12000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर दुसरीकडे या योजनेत ग्राहकांना पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर किंवा फ्री-लूक कालावधी संपल्यानंतर कर्ज घेता येते. कर्जाची कमाल मर्यादा पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर अवलंबून असते.

या योजनेत गुंतवणूकीसाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला किंवा एलआयसी एजंट, ब्रोकर किंवा जवळच्या सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.