दुप्पट झाली कमाई! पीएम मुद्रा योजनेच्या लाभार्थ्याची कहाणी, पंतप्रधानांनी पाठ थोपटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 8 एप्रिल रोजी मुद्रा कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा केली. या योजनेच्या मदतीने हजारो लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करता आला. या योजनेच्या मदतीने अनेकांना व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करता आले. या योजनेचा मुख्य उद्देश हा सूक्ष्म उद्योग आणि छोट्या व्यावासायिकांना आर्थिक हातभार लावणे हा आहे. या योजनेतंर्गत गेल्या 10 वर्षांत 50 कोटींहून अधिक कर्ज खाती मंजूर करण्यात आली आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #10YearsOfMUDRA त्यांचे मनोगत व्यक्त केले. मी देशभरातून मुद्रा कर्ज लाभार्थ्यांना माझ्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलाची माहिती दिली.

 

लाभार्थ्यांनी सांगितली त्यांची यशोगाथा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चा केली. त्यांनी यावेळी त्यांचे अनुभव कथन मांडले. अनेक लोकांनी या योजनेच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात काय काय बदल झाला, त्याची माहिती दिली. इतकेच नाही तर या योजनेच्या आर्थिक मदतीने त्यांना स्वतःच्या पायावर उभ राहता आले असे त्यांनी सांगितले. यापूर्वी ही लोक केवळ 20 हजार रुपयांची कमाई करत होते. पण या योजनेच्या मदतीमुळे त्यांची कमाई दुप्पट झाली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अनेक तरुणांशी संवाद साधला. त्यातील काहींनी सांगितले की, जेव्हा त्यांनी नोकरी सोडली तेव्हा त्यांचा पगार 70 हजार रुपयांच्या घरात होता. पण स्वतःचं काही करायचं असल्याने त्यांनी मुद्रा योजनेची मदत घेतली. आज या योजनेच्या मदतीने त्यांनी 70 हजार ते 2 लाख रुपये महिना कमावला. याशिवाय ते आता इतर लोकांच्या हाताला सुद्धा काम देत आहेत.

 

महिलांना घेतला या योजनेचा सर्वाधिक लाभ

 

पंतप्रधान मुद्रा योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्थ मंत्रालयाचे सचिव एम नागराजू यांनी ANI ला याविषयी माहिती दिली. विना तारण कर्ज योजना पंतप्रधानांनी सुरू केली होती. गेल्या 10 वर्षांत 50 कोटी कर्ज खाते मंजूर करण्यात आली. या योजनेत एकूण 33 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या योजनेत 68 टक्के महिला लाभार्थी आहेत. तर यामधील 50 लाभार्थी हे अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीय समाजातील आहेत. लाभार्थी हे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकतात.

 

या योजनेतील एक लाभार्थी कमलेश यांनी त्यांची यशोगाथा सांगितली. त्यानुसार, ते टेलरिंगचे, कपडे शिवण्याचे काम करतात. त्यांनी आता तीन महिलांना रोजगार दिला आहे. त्यांनी मुलांना चांगल्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश दिला आहे.