पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता कधी जमा होणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता कधी येईल आणि तुमचे नाव योजनेच्या नवीनतम यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या…

 

PM किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम-किसान) २० व्या हप्ता कधी जमा होणार यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात पाठवली जाते. आता या योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी करण्यात आला.

 

PM किसान सन्मान निधी योजना काय आहे?

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आहे.

 

२० वा हप्ता नेमका कधी येणार?

 

सरकार वर्षातून तीनदा पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे ४-४ महिन्यांच्या अंतराने पाठवते. सरकारने यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये १९ वा हप्ता जारी केला होता. अशा परिस्थितीत, २० वा हप्ता ४ महिन्यांनंतर म्हणजे जून २०२५ मध्ये कधीही येऊ शकतो. सरकारने यासाठी कोणतीही अधिकृत तारीख दिलेली नाही परंतु, लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते जाणून घ्या

 

पुढील हप्ता मिळविण्यासाठी तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर अशा प्रकारे तुम्ही यादीत तुमचे नाव सहजपणे तपासू शकता.

 

– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

 

– होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.

 

– आता तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा आणि ‘रिपोर्ट मिळवा’ वर क्लिक करा.

 

– आता लिस्टमध्ये तुमचे नाव शोधा

 

OTP द्वारे असे तपासा

 

– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

 

– येथे eKYC पर्यायावर क्लिक करा.

 

– आता आधार क्रमांक आणि कॅप्चा एंटर करा.

 

– यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो एंटर करा आणि सबमिट करा.

 

बायोमेट्रिकद्वारे असे तपासा

 

– जवळच्या सीएससी केंद्रात जा.

 

– तेथे फिंगरप्रिंट स्कॅन करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.