नमो शेतकरी सन्मान योजनेचा चौथा हप्ता या तारखेला मिळणार तारीख फिक्स…

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की केंद्र सरकारने राज्य सरकार मार्फत विविध योजना चालू करण्यात आलेला आहे या योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसांना राहावा व त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी हा उद्देश आहे. याच योजनांमध्ये काही योजना या शेतकऱ्यांसाठी देखील चालू करण्यात आलेला आहे. की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत केली जाईल आजच्या लेखांमध्ये आपण ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ बद्दलची माहिती पाहणार आहोत. मिळणारा चौथ्या हप्ता बद्दल शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत. ते निर्णय कोणते? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आणि ‘पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या’ लाभार्थ्यांसाठी आहे. खरंतर पीएम किसान सन्मान निधी ही योजना पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने सुरु झालेली एक महत्वाची डीबीटी स्वरुपाची योजना आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत असून याची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हा पासून तर आता पर्यंत या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2-2 हजाराचे 16 हप्ते दिण्यात आले आहेत.

 

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र हे 6000 रुपये एकसात दिले जात नाहीत. 2000 रुपयांचा एक हप्ता असे एका आर्थिक वर्षात तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय आहे. म्हणून या योजनेची लोकप्रियता पाहता महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर एक तशीच नवीन योजना सुरु केली आहे.

 

जिचे नाव ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आहे. नमो शेतकरी योजनेचे स्वरूप पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे. विशेष म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरवले जात आहेत. अर्थातच महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना केंद्राचे पीएम किसानचे 6000 हजार रुपये मिळत आहेत. त्यांना नमो शेतकरीचे देखील 6000 रुपये दिले जात आहेत. या नमो शेतकरी योजनेंतर्गत आता पर्यंत एकुण 2-2 हजारांचे तीन हप्ते दिले गेले आहेत.

 

तसेच आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच दिला गेला होता. म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्या सोबत राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा लाभ मिळाला आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासोबतच, म्हणजेच 17 व्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो

 

असा सूत्रांकडून दावा केला जात आहे. आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा जून महिन्यात अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण की, त्यवेळी 16 व्या हप्ता ला चार महिने होतात, आणि या योजनेचा हप्ता चार महिन्याच्या अंतरानेच दिला जातो.नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील जून जुलै मध्येच शेतकऱ्यांना मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनीच पीएम किसानचे 17 व्या हप्त्याचे 2000 रु. आणि नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकुण 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज आहे. बाकी याबाबत शासनाकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

 

अशाप्रकारे पीएम किसान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्हीचे हप्ते एकदम दिले जातील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.