महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) आपली सेवा अधिक व्यापक आणि फायदेशीर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचले आहे. महामंडळाने आता पार्सल वाहतूक सेवेसाठी चालक आणि वाहक यांच्यावरच जबाबदारी सोपवली असून, ही सेवा सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.यासाठी २०२७ पर्यंत खासगी कंपनीला टेंडर दिले आहे. यामुळे नागरिकांची अधिक सोय होणार असून, पार्सल सेवा सुरक्षित होणार आहे.
खासगी कंपनीला २०२७ पर्यंतचे टेंडर
एस.टी मंडळाच्या निर्णयानुसार आता बसमधून छोट्या-मोठ्या वस्तूंचे पार्सल देखील पाठवता येणार आहे.ही जबाबदारी संबंधित गाड्यांचे चालक आणि वाहक यांच्यावर असणार आहे. पार्सलची नोंद, सुरक्षितता, पोहोचवण्याची प्रक्रिया यावर नियंत्रण ठेवण्याचे काम आता त्यांच्यावर असणार आहे. महसूल वाढवणे आणि एस.टी.ची सेवा अधिक उपयुक्त बनवणे, गावोगावी आणि तालुक्यांमधील पार्सल वाहतुकीसाठी खासगी वाहनांवर असलेली निर्भरता कमी करणे. यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. तसेच पार्सल बाबतीत अनेक तक्रारी एस टी. मंडळाकडे आल्या होत्या.त्यामध्ये पार्सलची मोडतोड होणे, वेळेवरती पार्सल न जाणे, यामुळे एस टी.मंडळाने खासगी कंपनीला पार्सल सुविधेचे काम दिले आहे. यापुढे खासगी कंपनीकडे पार्सल पाठविण्याची जबाबदारी असणार आहे. यासाठी कंपनी बसस्थानकावर पार्सलसाठी ऑफिस काढणार आहे.
महामंडळाच्या निर्णयामागील उद्देश म्हणजे महसूल वाढवणे आणि एस.टी.ची सेवा अधिक उपयुक्त बनवणे, गावोगावी आणि तालुक्यांमधील पार्सल वाहतुकीसाठी खासगी वाहनांवर असलेली निर्भरता कमी होईल, तसेच अवैध्यारित्या पार्सल पाठविण्यावर पायबंध बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परिवहन खात्याच्या महसुलात वाढ
महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “सध्या अनेक बसगाड्या अर्धवट प्रवाशांसह धावत आहेत. या रिकाम्या जागेचा उपयोग पार्सल वाहतुकीसाठी केल्यास, महसूलात चांगली वाढ होऊ शकते. त्यामुळे चालक आणि वाहक यांना त्याचं प्रशिक्षण देऊन, त्यांना हे काम सोपवण्यात येत आहे.” कारण यापूर्वी पार्सल सेवा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषतः मोठा फायदा होणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला सुलभ, विश्वासार्ह आणि वेळेवर पार्सल सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.